केजरीवाल झाले आयसोलेट, उद्या होणार कोरोना टेस्ट
नवी दिल्ली, दि. ८ -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. ताप तसंच घसा दुखत असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. स्वत:ला त्यांनी आयसोलेट केलं असून त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. रविवारी दुपारपासून सर्व बैठका रद्द केल्या. शिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोणालाही भेटलेले नाहीत. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.
विशेष म्हणजे कालच दिल्लीच्या केजरीवाल सरकारने रुग्णालयांचं वर्गिकरण केलं. दिल्लीतल्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात फक्त दिल्लीकरांवरच उपचार केले जातील, असा निर्णय केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. दिल्लीतील मध्यवर्ती रुग्णालयात केवळ दिल्लीबाहेरील लोकांवर उपचार केले जातील, असं काल जाहीर केलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: हा निर्णय जाहीर केला. डॉक्टर महेश वर्मा कमिटीने दिल्ली सरकारला याची सूचना केली होती.