fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

‘या’ अभिनेत्रीने केला आत्महत्येचा व्हिडिओ शूट, बॉयफ्रेंड ठरला कारण!

कन्नड सिनेसृष्टीमधील अभिनेत्री चंदना हीने विषप्राशन करून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान चंदनाने बंगळूरू येथे सोमवार (1 जून) दिवशी आत्महत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार चंदनाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रसंगाचं व्हिडिओ शूट देखील केलं आहे. चंदनाचा कथित बॉयफ्रेंड दिनेश मुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं देखील म्हटलं आहे. दरम्यान सध्या दिनेश फरार आहे.

चंदनाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र तोपर्यंत तिचं निधन झालं होतं. सोशल मीडियावर चंदनाच्या विषप्राशन करण्याचा व्हिडिओ अनेकांना पहायला मिळाल्यानंतर सध्या या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे.

IB Times च्या वृत्तानुसार, चंदना आणि दिनेश एकमेकांना मागील वर्ष डेट करत होते. दरम्यान चंदनाच्या कुटुंबाकडून लग्नाची बोलणी झाली तरच तो तिच्यासोबत लग्न करेल अशी अट होती. या दोन्ही कुटुंबात भेट झाली होती मात्र गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत. चंदनाच्या आत्महत्येच्या निर्णयानंतरही तिच्यावर मानहानीकारक शब्दांचा वापर झाला. व्हिडिओमध्ये तिने दिनेश व्यथित होता, तो नकार पचवू शकला नाही याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान दिनेश आणि तिच्या कुटुंबावर चंदनाची फसवणूक करण्याबद्दल FIR दाखल करण्यात आली आहे. Saddagunte Palya पोलिस स्टेशनमध्ये याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: