fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने शेयर केला न्यूड फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने इंस्टाग्रामवर नुकताच आपला न्यूड फोटो अपलोड केला आहे.सध्या सोशल मीडियात तिच्या या फोटोने खळबळ उडवली असून नेटकऱ्यांनी त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

तिने या फोटोसोबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ‘कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया, तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं। त्याचबरोबर तिने क्रिकेटर शमी अहमद के साथ असे लिहित पोस्ट शेअर केली आहे.

मोहम्मद शमीवर पत्नी हसीन जहाँने अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. आपल्याला शमी आणि त्याच्या नातेवाईकांमुळे शारीरिक आणि मानसिक हिंसेला सामोरे जावे लागल्याचा आरोपही तिने केला होता. याचबरोबर तिने शमीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही केला होता. शमीविरोधात हसीनने पोलिसात तक्रार केली होती. शमीची याप्रकरणी अनेकदा चौकशीही झाली. दरम्यानच्या प्रकारानंतर हसीन शमीच्या घरी देखील राहायला आली होती. परंतु सध्या ती माहेरी असून आता पुन्हा एकदा तिने सासरी येत पुन्हा एकदा राडा घातला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: