fbpx
Monday, September 25, 2023
ENTERTAINMENT

अखेर ठरलं, अक्षयकुमार चा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ऑनलाइन रिलिज होणार

देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे फिल्मसिटीदेखील बंद असल्यामुळे अनेक चित्रपटाचं चित्रीकरण, प्रमोशन सारं काही बंद आहे. तसंच चित्रपटगृहदेखील बंद असल्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. त्यामुळेच अनेक दिग्दर्शक,निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट चित्रपटगृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लवकरच अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकल्याचं सांगण्यात येत आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. याच कारणास्तव चित्रपटाच्या टीमने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

या आधीही अभिनेत्री विद्या बालन यांचा गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक शकुंतला देवी हा चित्रपटदेखील आता डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शूजित सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: