fbpx
Saturday, April 20, 2024
MAHARASHTRA

कोरोना- महाराष्ट्रात 85 मृत्यू, पुण्यात 318 नवीन रुग्ण

आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री

मुंबई, दि.२८ : राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज  ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत  ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.दरम्यान पुणे शहरात आज 318 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक-१ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५  रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला -४, औरंगाबाद -३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि  रायगड येथील १ मृत्यू आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार २११ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६५.६१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading