fbpx

सीए अभय शास्त्री यांची ‘लायन्स’च्या प्रांतपालपदी निवड

पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ संस्थेच्या प्रांतपालपदी सीए अभय शास्त्री यांची निवड झाली आहे. प्रथम उपप्रांतपाल म्हणून हेमंत नाईक, तर द्वितीय उपप्रांतपाल म्हणून राजेश कोठावदे यांची निवड झाली आहे. जुलै २०२० ते जुन २०२१ या कालावधीसाठी ही निवड असणार असून, लायन्स क्लबच्या नुकत्याच ऑनलाईन झालेल्या परिषदेत निर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

विद्यमान प्रांतपाल उद्योजक ओमप्रकाश पेठे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच ब्रह्मकुमारी सुनीता दीदी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी माजी आंतरराष्ट्रिय संचालक नरेंद्र भंडारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे (सीआयआरटी) संचालक राजेंद्र सानेर पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: