Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार मराठी चित्रपट “परिणती”


कोविड 19 वायरस मुळे पूर्ण देश बंदिस्त आहे , त्या मुळे प्रत्येक जन भविष्य आणि वर्तमान काळा चा विचार करत आहेत. ह्या वायरस मुळे मराठी चित्रपट सृष्टि देखील बंद आहे , पण आता मराठी चित्रपट निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यातसाठी थेट ओटीटी कड़े वळणार असे वाटत आहे . बॉलीवुड चित्रपट देखील ओटीटी कड़े वळले आहेत . सध्या चित्रपटग्रहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने ओटीटी हा पर्याय निर्मातयां कड़े आहे .
चित्रपटाचे निर्माता आणि बॉलिवूडचे नामांकित कास्टिंग डायरेक्टर पराग मेहता (Paragg Mehta) ह्या बद्दल भाष्य करताना म्हणाले, “बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले पाउली टाकली आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बाजारातील सामान्य परिस्थिति अशी आहे की प्रादेशिक चित्रपटांना सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागेल कारण आपल्याला काही प्रमाणात टिकून राहावे लागणार आहे आणि त्या करिता आपल्या प्रेक्षकांना चांगली सामग्रीदेखील द्यावी लागेल. आमच्यासमोर हा एक पर्याय होता आणि डिजिटल उत्क्रांतीचा उदय म्हणून एखाद्याला पुढाकार घ्यावा लागणारच होता आणि मी तो घेतला आहे, ”ते पुढे म्हणाले की, आम्ही काहींशी चर्चेत आहोत आणि आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि चित्रपट प्रर्दशित करण्याची घोषणा लवकरच केली जाईल. ”
अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांची मुख्य भूमिका असलेला “परिणती” हा ओटीटी प्लेटफॉर्म वर प्रदर्शित होणार असून  ह्या चित्रपटाचे दिगर्दशन डेब्यूटंट दिग्दर्शक अक्षय बालसराफ ह्याने केले आहे ।

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading