fbpx

उद्यापासून लालपरी धावणार

मुंबई : करोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
राज्यात २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरातील अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण बंद आहे. परंतु, लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्य शासनाने रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्हा-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर उद्यापासून एसटी बससेवा सुरू होत आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. या बससेवेसाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्याचा तपशीलही परब यांनी दिला. अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.

प्रवासासाठी हे आहेत नियम…

१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
३. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: