Sunday, June 21, 2026
PUNE

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित, ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळांमध्ये फर्स्ट टर्मची फी न घेण्याचे आदेश द्या – रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

पुणे, दि. 28 – कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळा तसेच ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळांमध्ये फी ची कपात करूण अर्धी फी म्हणजेच फर्स्ट टमची फी न घेण्याचे आदेश शाळेना देण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विवेक बनसोडे यांनी या संदर्भातील पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाने थैमान घातले असून ते आटोक्यात यावे म्हणून मार्च महिन्या पासून लाँकडाऊन लावण्यात आला, त्यामुळे अनेकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. लोक जगण्याकरीता तारेवरची कसरत करत रोज मरमरचे जीवन जगत आहे अशात शाळा कॉलेज सुद्धा विद्यार्थ्यां करीता बंद आहेत. तरीही अनेक शाळेचा पालकांना फी मागण्याचा तगादा कायम आहे, फी भरा फी भरा म्हणून एसएमएस, इ मेल, फोनव्दारे फीची मागणी करण्यात येत आहे. आपण सोशल मीडिया पहा किंवा पालकांशी संवाद साधा प्रत्येकाची मागणी हिच आहे विद्यार्थी जर फर्स्ट टर्म मध्ये शाळेला जाणार नसेल तर आम्ही पुर्ण फी का भरावी? फी अर्धी म्हणजेच फर्स्ट टमची घेऊ नये लाँकडाऊनमुळे आर्थिक बाजू कमकुवत झालेल्या सर्व पालकांची मागणी रास्त आसून शासनाने ती विचारात घेतली पाहिजे त्याचबरोबर आरटीई मधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींना बुट, गणवेश, पुस्तके विकत घेण्याची सक्ती शाळेकडून केली जात आहे ते मोफत उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी विवेक बनसोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading