झेड. व्ही. एम. युनानी कॉलेजच्या वतीने ‘आयुष काढा ‘ पाकिटांचे वाटप

पुणे, दि. 24 – झेड. व्ही. एम. युनानी कॉलेज च्या वतीने खडकी बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात ‘आयुष काढा ‘ पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले . महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आबेदा इनामदार ,मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त डॉ राज खतीब ,नगरसेवक मनीष आनंद ,निसार खान यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जैनुद्दीन शेख,अझर खान ,शफिक शेख उपस्थित होते. आझम एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त बद्रुद्दीन शेख तसेच अरिफ सय्यद,अफझल शेख,अझर शेख ,इसहाक सय्यद यांनी संयोजन केले.
