ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला यश
पुणे, दि. 20 – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोना व्हायरसविरोधात विकसित बनवलेल्या लसीचा चाचणी अहवाल आला असून ही चाचणी यशस्वी ठरल्याचे सांगितेल जात आहे. ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक वाढवणारी असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच हे या लसीचा अहवाल अखेर ‘दि लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. वैद्यकीय क्षेत्राचे या रिपोर्टकडे लक्ष लागले होते. ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीमुळे जगभरात लाखो नागरीकांचे बळी घेणाऱ्या कोरोना विषाणुला रोखता येणे शक्य असल्याचे समजते. ऑक्सफर्डची लस पूर्णपणे मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून ती रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना देत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ही चाचणी १ हजार ०७७ जणांवर करण्यात आली. त्यांच्या या लसीचे प्रयोग झाले त्यांच्यामध्ये अँटीबॉडी आणि पांढऱ्या पेशी तयार होऊ लागल्या ज्या कोरोना व्हायरसशी लढण्यास उपयुक्त आहेत. अजून याचे मोठ्या प्रमाणात परीक्षण होणे बाकी आहे. ब्रिटेनने आधीच या व्हॅक्सिनचे १० कोटी डोस बनवून ठेवले आहेत. भारतातही या लसीचे उत्पादन होत आहे. पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया याला ऑक्सफर्डने लसीचे उत्पादन करण्याची जबाबदारी दिली आहे.
