Sunday, June 21, 2026
PUNE

दूध आंदोलन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने ठेवले दुधात

पुणे, दि. २१ -संकट जावे म्हणून पुर्वी देव पाण्यात ठेवले जायचे आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने दुधात ठेवले आहे. छावा संघटना दुध आंदोलन मध्ये सहभागी झाली असून दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

या विषयी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, सध्या स्थितीमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केलं जातं आहे. जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनत पाहतां हा अन्याय आहे. मुख्यमंत्री महोदय मायबाप आता यातुन मार्ग काढा शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन तुम्हांला आज मी दुधात ठेवून हि मागणी करत आहे असे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री यांना विडीओ द्वारे ट्वीट केले आहे. शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावा. अशी आर्त हाक देखील मारली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading