Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENT

आदित्य चोप्राने दिली होती धमकी; कंगना रनौतचा आरोप

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रनौतने निर्माता आदित्य चोप्रावर गंभीर आरोप केले आहेत. सलमान खानच्या सुलतान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास नकार दिल्याने आदित्य चोप्राने मला धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप कंगनाने केला आहे. तिच्या या आरोपामुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत बोलताना कंगनाने म्हटले आहे की, मला सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची ऑफर मिळाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला कथा ऐकवली. मात्र मला सलमान खानसोबत चित्रपट करायचा नव्हता. याबद्दल नंतर माझी आदित्य चोप्रासोबत भेटसुद्धा झाली. या भेटीदरम्यान मी चित्रपटाला नकार देत माफी मागितली होती. तेव्हा ते काहीच बोलले नाही. परंतु नंतर जेव्हा मी नकार दिल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकली तेव्हा त्यांचा मला मेसेज आला. मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली, तुझे करिअर उद्ध्वस्त करेन, तुला कुठेच काम मिळणार नाही, तुझे करिअर संपले, अशी धमकी दिल्याचे कंगनाने म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading