देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू
नवी दिल्ली, दि. 19 – देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशसने मान्य केलं आहे. आयएमच्या या दाव्याताला आता दिल्लीतील नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता सर्वाधिक भिती व्यक्त केली जात आहे.

सामूहिक संसर्ग हा संपूर्ण देशात सुरू झालेला नाही. तर देशातील काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर सामूहिक संसर्ग आहे. देशातील कोरोनावरील स्थितीचा अभ्यास करून आयएमएने जो दावा केला आहे, तो पूर्णपणे बरोबर आहे, असं दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. अरविंद कुमार म्हणाले.
देशाला दिवसाला ३० ते ३५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहेत. त्यामुळे देशात सामूहिक संसर्ग सुरू झालाय असं म्हणण्यास काही वावगं नाही, असं डॉ.अरविंद म्हणाले.
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळेच भारतात करोनाचा प्रादुर्भाव हा आता अतिशय वेगाने होत आहे, असं सांगण्यात येतंय. यावरूनच आएमएने करोनाचा देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलंय. आणि यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
दिल्लीतील २५३२ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला. यापैकी जवळपास १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांनी आपला प्लाझ्मा दान केला आहे. हे पोलीस कोरोना योद्धे आहेत. आता त्यांनी प्लाझ्मा दान केल्याने ते प्लाझ्मा योद्धे झाले झाले आहेत. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती ही महिन्यातून दोन वेळा आपला प्लाझ्मा दान करू शकते, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
