पुण्यात दिवसभरात १५०८ पाझिटिव्ह रुग्ण; तब्बल ४४ मृत्यू
पुणे, दि. १९ – मागील सलग तीन दिवस शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज १८०० पेक्षा जास्त वाढ होत होती. रविवारी शहराला किंचित दिलासा मिळाला असून आज १ हजार ५०८ रूग्णांची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासात पुणे शहरात कोरोना मुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

१९ जुलै पुणे शहरातील परिस्थिती
– दिवसभरात १५०८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५५७ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ४४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. तीन रुग्ण पुण्याबाहेरील.
– ५५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ९४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३७३८६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १३७९९.
– एकूण मृत्यू -९७६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- २२६११.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३८१५
