मोफत जलनेती पात्र वाटप
पुणे, दि. 19 – दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलचे सुप्रसिद्ध डाॅ. धनंजय केळकर यांनी जलनेती हा उपाय वापरून कोरोनाचा प्रार्दुभाव टाळता येतो. असा दावा केला आहे. ‘वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवाराचे’ वतीने मोफत जलनेती पात्र वाटप करण्यात आले.

1202 दत्त वसाहत, पाटीलबंगला, रामनारायण बंगला, वाडेकर बंगला, शेळके बंगला, शिवाजीनगर पोलिस वसाहत, माॅडेल काॅलनी, शिवाजीनगर गावठाण, आपटे रोड , घोले रोड, माॅर्डन काॅलेज परिसर, फर्ग्युसन कॉलेज परिसर, पुलाची वाडी या परिसरातील नागरिकांना मागणी प्रमाणे कुटुंबासाठी एक ‘नेती पात्र’ मोफत देण्यात येईल. अशी माहिती बाळासाहेब अमराळे यांनी दिली.
या उपक्रमाचा शुभारंभ शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णाताई गोसावी, यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रताप खरोसे, नंदकुमार मंडोरा, दत्ताभाऊ खंडाळे, विनोद चव्हाण, बाप्पू पासलकर, बाळासाहेब कदम, केशव पाटसकर, जवाहर गुजर, छाया चव्हाण, शकुंतला मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
