Sunday, June 21, 2026
PUNE

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त गरजू व्यक्तींना किराणा साहित्याचे वाटप

पुणे, दि. 26 – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सपना माळी आणि त्यांचे सहकारी मंडळीं नी गरजू व्यक्तींना किराणा साहित्याचे वाटप केले. वाढदिवस म्हणजे तसा एका वेगळ्या आनंदाचा क्षण मात्र अलीकडे आलेले कोरोनाचे संकट पाहता गरिब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली आहे.

सपना माळी म्हणाल्या, या परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा करण्यात धन्यता वाटली नाही कारण माझे बांधव उपाशी पोटी झोपत असतांना मी त्यांच्या साठी जे जे मदत कार्य होईल ते करते आहेच, त्याच अनुषंगाने मला आजच्या दिवशी देखील गरजू व्यक्तींना मदत कार्य करून आशीर्वाद घेणे महत्वाचे वाटले…
अनेकांचे रोजगार ठप्प आहेत, काहीही आधार नाही असे निराधार बांधव आपल्या प्रत्येकाच्या थोड्याशा मदतीने हे संकट पार करू शकतात हेच त्यांना या निमित्ताने सांगावे वाटते.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, सर्वांनी आपले आणि कुटुंबियांचे वाढदिवस साजरे न करता ती आर्थिक मदत किंवा वस्तूंच्या रूपाने मदत देऊन आपला वाढदिवस गरजू व्यक्तींचे आशीर्वाद घेऊन साजरा करावा.

वाढदिवस म्हणजे काय तर आपण जन्माला आलो तेव्हा आपली आई आपले रडणे पाहून हसते मात्र आपले लेकरु आयुष्यात परत कधीच रडू नये म्हणून ती प्रार्थना करते हेच आपण आपल्या आयुष्यातल्या जनसेवेत असेच आयुष्य जगायला हवे.
आपल्या मनाला समाजात कोणीही मदतीसाठी समोर दिसत असेल तर वेदना होऊन आपण सत्कार्य करून पुढे जायला हवे अन्यथा आपण माणूस म्हणून कमी पडतो आहोत असे होईल असे वाटते.

यावेळी संतोष शिंदे, दादा महाराज नगरकर, महादेव मातेरे, गणेश चर्हाटे, जयकर कदम, राजू रणदिवे, शिवाजी म्हस्करे, इंजिनिअर प्रकाश खंदारे, दिलिप सपरे, अविनाश गावडे इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading