Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

आज तब्बल ५ हजार २४ नवीन कोरोनाबाधित आणि १७५ मृत्यू

कोरोनाच्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू; राज्यात आतापर्यंत सुमारे पावणेनऊ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२६: राज्यात आज कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार  ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६५ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading