राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
मुंबई दि.21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली.
सांताक्रुझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या वतीने योगवर्गाचे आयोजन करण्यात आले.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
