Monday, May 4, 2026

त्रिनयना देवी

ENTERTAINMENTLatest News

त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध !

नेत्राच्या नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला  जुळी मुलं  होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं  डोहाळेजेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरु होतात. रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो. इंद्राणी व राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते. उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना त्या हातगाडीचं चाक निखळतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ती हातगाडी धरतं आणि दिसतं की नेत्राला घेऊन जाणारी… अद्वैत च्या मदतीला धावून आलेली डॉक्टरचा वेश धारण केलेली त्रिनयना देवी आहे… ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते. त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य  प्रकाशझोत पसरतो आणि  नेत्रा २ बाळांची आई होते. देवी तिच्या मूर्त  रूपात दर्शन देत नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना (Premonition) मिळण्याची जी ताकद आहे ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असं सांगते. नेत्रा विरोचकाचा वध  करते. वध  होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो परंतु त्या रक्ताचाच एक थेंब प्रवाही दिसतो. काय असेल या मागचं रहस्य? कि आहे कोणत्या नव्या संकटाची चाहूल? तेव्हा पाहायला  विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रोज रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest News

कलियुगातील अंतिम युद्ध कशी जिंकणार नेत्रा?

रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा युद्ध कसं जिंकते हे आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. मनोरमाच्या अस्थि इंद्राणीला परत मिळतील, याबद्दलची सर्वांची आशा मावळू लागते. त्याचवेळी नेत्रा-इंद्राणीला एक आशेचा किरण दिसतो. त्या दोघी ठरवतात, रूपाली जेव्हा अस्तिकाला भेटायला जाईल तेव्हाच तिचा पाठलाग करायचा. ठरल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी रूपालीचा पाठलाग करतात. अव्दैतला मात्र नेत्राच्या जीवाला धोका तर नाही ना, अशी चिंता लागून राहते. पण नेत्राला दिलेल्या वचनामुळे अव्दैत घरीच थांबतो. नेत्रा आणि इंद्राणी आपला पाठलाग करत आहेत हे रूपालीला आधीच माहित असल्यामुळे रूपाली इंद्राणीवर हल्ला करून तिला बेशुद्ध करते. त्यानंतर नेत्रावर हल्ला करणार तोच नेत्रा रूपालीचा हात धरून तिचा हल्ला रोखते. त्याचवेळी अस्तिकाही तिथे येते. एका बाजुने रूपाली आणि एका बाजुने अस्तिका अशा पद्धतीने दोघांनाही नेत्राने रोखून धरल्यामुळे त्या दोघींना काहीच करता येत नाही. नेत्राने गळा धरल्यामुळे अस्तिकाचा जीव घुसमटतो. त्यानंतर अस्तिका नागरूपात येते. नागरूपात आल्यावरही अस्तिकाला नेत्राचा प्रतिकार करता येत नाही. अस्तिका जखमी होऊन जमिनीवर पडते. अशा प्रकारे कलियुगातील अंतिम युद्धाला सुरुवात होते. पण रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा अंतिम युद्ध कसं जिंकते हे आपल्याला २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

नेत्रा, इंद्राणी आणि रूपालीला दिसणार त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आजीच्या मृत्यूमुळे घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रूपालीचा खरा चेहरा सर्वांना कळल्यामुळे सर्वजण रूपालीला पाहून घाबरू लागले आहेत. नेत्रा मात्र घरातील सर्वांना धीर देत आहे. एके दिवशी नेत्रा आणि इंद्राणी रूपालीचा सामना करण्यासाठी मनोरमाची शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चमत्कार घडतो. रूपाली मनोरमाच्या अस्थी पाहत असताना एक दिव्यप्रकाश चमकून जातो. हाच प्रत्यय नेत्रा आणि इंद्राणीलाही येतो. या दोघींनाही त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश दिसतो. त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी दिव्यप्रकाशाबद्दल बोलत असताना नाग ऐकतो. पण रूपाली मात्र आतून घाबरली आहे कारण दिव्यप्रकाश दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातावर त्रिनयना देवीचं चिन्हसुद्धा तिला दिसतं. रूपालीला त्रिनयना देवीचं चिन्ह हातावर का आलं आहे, याचा अर्थ लागत नाही.मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश दिसल्यावर महत्त्वपूर्ण बदल मालिकेत होणार आहेत. तसेच मनोरमाची शक्ती कुणाला मिळणार नेत्राला की रूपालीला हेही लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. यासाठी पाहायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest News

राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून वाचवू शकेल का नेत्रा?

नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच  विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते. इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल. कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे. कदाचित अस्तिकाचं या घरात येणं, विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला इथपर्यंत आणलं असेल, नेत्राचं हे बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. आणि म्हणते, नेत्रा तू चाणाक्ष आहेस, तू बरोबर ओळखलंस आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस पण दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. नेत्रा मात्र विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसेच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते हे आपल्याला महाएपिसोडमध्ये कळणार आहे. तर  बघायला  विसरू नका  ‘सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या’ सोमवार ते शनिवार १०:३० वाजता तुमच्या झी मराठी वाहिनी वर

Read More
ENTERTAINMENTLatest News

अखेर रूपालीचं सत्य अव्दैतला समजणार!!

प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण जवळ आला आहे. कधी एकदा रूपालीचं सत्य अव्दैतला कळतंय, असं प्रेक्षकांना वाटत

Read More
ENTERTAINMENTLatest News

कलियुगातील विरोचकाशी नेत्राचा सामना होणार

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत विरोचक कोण असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण त्याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. नेत्रा, इंद्राणी आणि शेखर या तिघांनाच फक्त कळतं की विरोचक रूपाली आहे. पण रूपाली विरोचक आहे, हे खुद्द रूपालीलाही माहित नाहिये. जसजशी पंचपिटिका रहस्यातील एकेक पेटी सापडत आहे, त्यातून नवे नवे रहस्य उलगडले जात आहे. तिसऱ्या पेटीतील कोडे सर्पलिपीत असल्यामुळे नेत्रा-इंद्राणीला दिवाडकरांची मदत घ्यावी लागते. सर्पलिपीतील कोड्याचा अर्थ लावताना नेत्रा-इंद्राणीला कळतं की अव्दैत विरोचक नाही, तो आधीच्या जन्मात विरोचकाचा सेवक होता. त्याला त्रिनयना देवीने या जन्मी सातव्या मुलीच्या सातव्या मुलीशी विवाह करून तिचा सारथी होशील असा वर दिला. त्यामुळे नेत्राचा या जन्मातील मृत्यूयोग टळला आहे. कारण त्रिनयना देवीनेच नेत्रा-अव्दैतची लग्नगाठ बांधली आहे. सध्या मालिकेत नेत्रा अव्दैतला नागापासून वाचवताना दिसली तशीच तिच्यातील देवीचा अंश अधिक जागृत होत चालला आहे, हेही आपण पाहिलं. त्याचप्रमाणे रूपालीमध्ये विरोचकाची शक्ती हळूहळू दिसायला लागली आहे. परंतु रूपालीला तिच्या शक्तीचा अंदाज अजून आलेला नाही. नेत्रा इंद्राणी विरोचकाच्या रूपातील रूपालीचा सामना यापुढे कसा करतील, रूपालीला कळेल का ती विरोचक आहे, अव्दैत त्रिनयन

Read More
ENTERTAINMENTLatest News

पंचपिटिका रहस्याच्या शोधात नेत्रा

पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिलं जातं. पण इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं,

Read More
ENTERTAINMENTLatest News

त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ अजून वाढणार!

आजोबांना शिक्षा होणार, मनोरमाने दिलेल्या शापामुळे त्यांचा मृत्यू अटळ आहे, परंतु हे सगळं घडणार कसं, त्रिनयना देवी नेत्राला या संबंधित

Read More
ENTERTAINMENTLatest News

अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधणार

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले असून मालिकेत दर आठवड्याला उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला

Read More
ENTERTAINMENTLatest News

अव्दैत नेत्राचा जीव वाचण्यासाठी काय करणार?

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलेली असताना ३० जुलैच्या महाएपिसोडमध्ये अव्दैत नेत्राचा जीव

Read More
ENTERTAINMENTLatest News

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठं रहस्यमय लग्न

मालिका सध्या अव्दैत-नेत्राच्या लग्नासंबंधीच्या रहस्यमय वळणावर आली असून अव्दैत आणि नेत्राच्या लग्नाचं रहस्य काय असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नेत्राला

Read More