शाईफेक हल्ला.. . ‘विकास लवांडे’वर नव्हे…. तर.. ‘संतांचा महाराष्ट्र’ या लौकिका’वरचा हल्ला…!! ⁃ काँग्रेसने केला तीव्र निषेध…!!!
पुणे : स्वतःस तथाकथित वारकरी म्हणवणारे हल्लेखोर संग्राम भंडारे याने राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रवक्ते आणि प्रवचनकार विकास लंवाडे यांच्यावर केलेला भ्याड शाईफेक हल्ला, हा केवळ विकास लवांडे यांच्या पर्यंतच् मर्यादीत नसुन, देशास दिशा देणाऱ्या, शिव छत्रपती, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेबा ते जगदगुरु तुकोबारायांच्या सहिष्णू संस्कारांच्या शिकवणुकीवरचाच् हल्ला असून या निंदनीय शाईफेक हल्ल्याचा कॉंग्रेस तीव्र निषेध करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन केले.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, तथाकथित वारकरी म्हणवणारे संग्राम भंडारे यांनी या पुर्वीही काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमक्या देत, आपली झुंडशाहीची प्रवृत्ती दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मोठे जनआंदोलन ऊभारून त्या प्रकाराचा निषेध केला गेला होता, याचे किमान स्मरण तरी भंडारे यांनी ठेवायला पाहिजे होते. मात्र देशातील एकमेव असलोल्या ‘महाराष्ट्राच्या संत – वारकरी सहिष्णू परंपरा’, नष्ट करू पाहणाऱ्या अतिरेकी प्रव्रत्तीस सध्या राजाश्रय मिळत असल्याने भंडारे, जगताप, राणे इ प्रवृत्तीचे फावले आहे. यामुळे “महाराष्ट्राच्या सभ्य-सुसंस्कृत, संत संस्काराच्या व सहिष्णूतेच्या सार्थ लौकिकास” धुळीस मिळवण्याचे निंदनीय कृत्य या परंपरा-विघातक प्रवृत्ती करत आहेत, असा थेट आरोपही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केला.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, शारीरिक किंवा शाब्दिक हल्ले सोसत, संतांनी भेदाभेदविरहित समतेची पायाभरणी केली. महाराष्ट्रात मानवी मुल्यांची व समतेची पायाभरणी करणारे श्रीमंत शाहू महाराज, समाजसुधारक व सत्यशोधक समाजाची निर्मिती करू पहाणारे महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांसह बुद्धी प्रामाण्यवादी असलेल्या आगरकर, महर्षी कर्वेंसह कर्मवीर भाऊराव पाटील इ. शिक्षण प्रणेत्यांच्या संस्कार व योगदानातुन आजचा पुरोगामी, विकसीत व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे. पण पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी महाराष्ट्र बनवण्यासाठी सनातनी प्रवृत्तींनी कंबर कसलेली आहे हे आजच्या महाराष्ट्राचे दुर्दैव होय..!
‘देशास अध्यात्मिक व सामाजिक दिशा देणारा वारकरी संप्रदाय’ हा प्रेम, भक्ती, सहिष्णुता, समतेचा व औदार्याचा मार्ग दाखवतो, मानवी मुल्यांची जोपासना करण्याचे शिकवतो. मात्र भंडारे यांच्या निंद्य कृत्याने, वारकरी संप्रदायात कट्टरतावादी व हिंसक प्रवृतींचा शिरकाव झाल्याचेच् स्पष्ट होते.
वारकरी संप्रदाय या अशा अनिष्ट प्रवृत्तीतुन मुक्त करणे आजच्या काळाची गरज आहे असेही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
संत ज्ञानोबा व जगदगुरू तुकोबांना छळणाऱ्या फॅसिस्ट प्रवृत्ती आज राजसत्तेत बसल्याने, महायुती मधील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘पुरोगामी’ म्हणवणारा ‘स्व. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ कोणत्या मजबूरीतुन(?) हे प्रकार सहन करतोय (?).. हे चिंताजनक असल्याची पुस्ती ही काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली..!
