Wednesday, April 29, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मी-नृसिंह नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

 

पुणे  : सदाशिव पेठेतील नृसिंह मंदिरात लक्ष्मी-नृसिंह नवरात्रोत्सव 2026 निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना मिळत आहे. या उत्सवात कीर्तन, प्रवचन आणि शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उत्सवात पहिल्या दिवशी (दि. २२) डॉ. आशिष रानडे आणि पं. आनंद भाटे यांनी आपली गायन सेवा अर्पण केली. तर दुसऱ्या दिवशी (दि. २३) सत्यजीत बेडेकर आणि गायन पं. शौनक अभिषेकीयांनी गायन सादर केले.

उद्या (दि. २४) ‘गोष्ट इथे संपत नाही’ (अफजलखान वध) ही कलाकृती सारंग मांडके व  सारंग भोईरकर सादर करणार आहेत. तसेच दि.२५ एप्रिल ला गायक अतुल खांडेकर यांचे शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे. तर  रविवार २६ एप्रिल रोजी डॉ. सलील कुलकर्णी व शुभंकर कुलकर्णी हे ‘धरोहर : वारसा स्वरांचा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. २७ एप्रिल ला डॉ. शंतनू गोखले यांचे संतूर वादन आणि सुयोग कुंडलकर यांचे हार्मोनियम वादन सादर होणार आहे.

मंगळवारी दि. २८ एप्रिल ला अभेद शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे. तर उत्सवाच्या शेवटी दि. ३० एप्रिल रोजी ह. भ. प. सदानंदबुवा ताम्हणकर यांचे श्री. नृसिंह जयंती जन्मोत्सव कीर्तन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम दररोज संध्याकाळी ८ वाजता सादर होणार आहेत. तसेच महोत्सवा दरम्यान दररोज संध्याकाळी ५:३० ते ७:०० कीर्तन ह. भ. प. सदानंदबुवा ताम्हणकर यांचे कीर्तन होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading