भारताच्या पहिल्या फास्ट ब्रीडर रिअॅक्टरसाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे भारताच्या नागरी अणुऊर्जा प्रवासात महत्त्वपूर्ण घटकांद्वारे योगदान
मुंबई : भारताने आपल्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. कल्पक्कम येथे असलेल्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर (PFBR) ने क्रिटिकलिटी म्हणजेच अणुभट्टी सुरू होऊन ती सुरक्षितपणे, नियंत्रित पद्धतीने ऊर्जा निर्माण करत आहे अशी स्थिर अवस्था साध्य केली आहे. त्यामुळे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता आणि कार्यक्षम इंधन वापरावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तीन-टप्प्यांच्या अणुऊर्जा आराखड्याच्या पुढील टप्प्यात प्रगती झाली आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रिसिजन इंजिनिअरिंग व्यवसायाने या महत्वपूर्ण टप्प्यात योगदान देत लार्ज रोटेटिंग प्लग (LRP), स्मॉल रोटेटिंग प्लग (SRP) आणि सोडियम पंप शाफ्ट यांचे उत्पादन व पुरवठा भारत सरकारच्या पूर्णतः मालकीच्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (BHAVINI) ला केला आहे.
या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणावरील फॅब्रिकेशन आणि उच्च-प्रिसिजन अभियांत्रिकी यांचे मिश्रण आहे. रोटेटिंग प्लग्सचा व्यास 8 मीटरपर्यंत असून त्यांचे एकत्रित वजन सुमारे 120 टन आहे. हे प्लग्ज 360 अंशांपर्यंत फिरण्यासाठी आणि रिअॅक्टरच्या कोअरमध्ये इंधन टाकण्यासाठी अचूक डिझाइन केलेले आहेत. 10 मीटर लांबीचा सोडियम पंप शाफ्ट द्रवरूप सोडियमच्या वातावरणात 500 RPM पेक्षा जास्त वेगाने कार्यरत होतो. त्यासाठी संतुलन, अखंड,समग्र साहित्य आणि कामकाज विश्वासार्हता यावर कठोर नियंत्रण आवश्यक असते. या घटकांची भारतात कोणत्याही पूर्वीच्या देशांतर्गत संदर्भाशिवाय डिझाइन आणि निर्मिती करण्यात आली आहे. या घटकांची निर्मिती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेली आणि अशा प्रकारच्या पहिल्या उपयोगासाठी साध्य झालेली आहे.
या यंत्रणेच्या अंमलबजावणीत अनेक अभियांत्रिकी आव्हानांवर मात करण्यात आली. त्यामध्ये विशेष बेअरिंग प्रणालींचा विकास, घर्षण नियंत्रणासाठी पृष्ठभाग प्रक्रिया तंत्रज्ञान आणि भूकंपा सारख्या कठोर परिस्थितीत कार्य करण्यासाठी डिझाइन केलेली गिअर प्रणाली यांचा समावेश आहे. या उपायसुविधांची निर्मिती आणि विकास पूर्णतः स्वदेशी पद्धतीने करण्यात आला असून मजबूत इन-हाऊस अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतांचे प्रतिबिंब यात आहे. हे घटक भारत सरकारच्या पूर्णतः मालकीच्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (BHAVINI) ला पुरवले जात आहेत.
PFBR ने क्रिटिकलिटी साध्य करणे हे 22 वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून भारताच्या तीन-टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. फास्ट ब्रीडर रिअॅक्टर PHWRs मधून प्लुटोनियमचा वापर करून बंद इंधन चक्र सक्षम करतात आणि अधिक फिसाइल मटेरियल पदार्थ तयार करतात. तसेच थोरियमच्या वापराला चालना देतात. सामान्यतः चार PHWRs एक फास्ट ब्रीडर रिअॅक्टरला इंधन पुरवू शकतात. भारत सध्या 19 PHWRs चालवित आहे आणि आणखी दहा 700 MWe युनिट्सना मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 846,000 टन थोरियम साठ्यामुळे हा टप्पा देशांतर्गत, कमी-कार्बन आणि स्वयंपूर्ण पद्धतीने ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
फॉसिल फ्युएलवरील अवलंबित्व कमी करत असल्यामुळे हा प्रकल्प भारताच्या नेट-झिरो प्रवासातीलही एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे थेट कार्बन उत्सर्जन शून्यावर येते असून कचरा कमी करण्यासाठी इंधन पुनर्वापर सक्षम होत आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप प्रगत अभियांत्रिकीच्या माध्यमातून भारताच्या धोरणात्मक आणि औद्योगिक क्षमतांना सातत्याने पाठबळ देत आहे, तसेच राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च-प्रिसिजन उपायसुविधा पुरवित आहे.
