Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी पुण्यात बैठक

पुणे, प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कॅम्प येथील रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पुण्याचे उपमहापौर तथा पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून महाड चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महासचिव अविनाश महातेकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस केंद्रीय व राज्य कार्यकारिणीतील निमंत्रित प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठक केवळ निमंत्रितांसाठीच असल्याने अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असेही परशुराम वाडेकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading