Thursday, October 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडेची दमदार एण्ट्री

स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘आनंदी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असून, कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही महत्त्वाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडे साकारणार असून तिच्या एण्ट्रीमुळे ‘आनंदी’ मालिकेतील नाट्य आणखी रंगतदार होणार आहे.

शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि तिची बहिण शलाका या जुळ्या बहिणी मात्र दोघींचेही स्वभाव पूर्णत: भिन्न. समिधा जेवढी सालस, शांत आणि सर्वांना आपलसं करून घेणारी तेवढीच शलाका उथळ,स्वतःच्या रूपाचा आणि पैशाचा अभिमान मिरवणारी. युगंधरने शलाकाची निवड न करता समिधाची पत्नी म्हणून निवड केली याची सल शलाका मनात बाळगून आहे. युगंधरला नेस्तनाबूत करणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश आहे. याचसाठी पैशाच्या जोरावर शलाकाने सुद्धा गार्मेंट व्यवसायात आपलं साम्राज्य उभं केलंय. जोवर युगंधर संपत नाही तोवर अंगावर कुठलाच रंग चढवणार नाही हे शलाकाने ठरवलं आहे. म्हणूनच ती फक्त काळया रंगाचे कपडे वापरते.

शलाकाच्या आगमनानंतर ‘आनंदी’ मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि नाट्य अधिक तीव्र होणार आहे. आता शलाका आणि युगंधर यांच्यातील संघर्ष कसा रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी न चुकता पहा आनंदी रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply