जागतिक संरक्षण ओईएम टोनबो इमेजिंगतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर
डीआरएचपी लिंक: https://www.jmfl.com/Common/getFile/5480
जागतिक संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) असलेल्या टोनबो इमेजिंग इंडिया लिमिटेडने भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त 18,085,246 पर्यतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.
या ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून 1,960,000 इक्विटी शेअर्स, प्रवर्तक समूह विक्री समभागधारकाकडून 339,700 इक्विटी शेअर्स आणि गुंतवणुकदार विक्री समभागधारकांकडून 15,635,046 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
2003 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभाग आणि सारनॉफ कॉर्पोरेशन येथे पूर्वानुभव असलेल्या तंत्रज्ञांनी स्थापन केलेली टोनबो इमेजिंग ही कंपनी, 2012 मध्ये प्रमोटर्सकडून संपूर्ण खरेदी (buyout) झाल्यानंतर संरक्षण-केंद्रित उत्पादन निर्मिती कंपनी म्हणून विकसित झाली. ही कंपनी अरविंद लक्ष्मीकुमार, अंकित कुमार आणि सेसिलिया डी’सूझा यांच्या प्रवर्तनाखाली आहे. हे प्रवर्तक गेल्या दोन दशकांपासून एकत्र कार्यरत असून जागतिक संरक्षण कार्यक्रम, उत्पादन अभियांत्रिकी आणि भांडवल उभारणीतील व्यापक अनुभव घेऊन आले आहेत.
कंपनीत गुंतवणूक केलेल्या नामांकित गुंतवणूकदारांमध्ये क्वालकॉम व्हेंचर्स, आर्टिमन एडलवाईस व्हॅल्यू, सेलेस्टा कॅपिटल II एलपी, एचबीएल इंजिनिअरिंग, टेनेसिटी व्हेंचर्स इंडिया एक्झिम बँक आणि फ्लोरिनट्री यांचा समावेश आहे.
डीआरएचपी मधील F&S रिपोर्टनुसार, सूचीबद्ध समकक्ष कंपन्यांमध्ये महसूल, EBITDA आणि PAT मार्जिन वाढीच्या (CAGR FY23–FY25) दृष्टीने टोनबो इमेजिंग ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आहे. याच कालावधीत, भारतातील सरकारी व संरक्षण संस्थांना पुरवण्यात आलेल्या थर्मल इमेजिंग सिस्टीम्सच्या विक्री मूल्यानुसार ही कंपनी सर्वात मोठी उत्पादक ठरली आहे.
आर्थिक वर्ष 25 मध्ये, भारताच्या थर्मल इमेजिंग निर्यातीपैकी 93% वाटा कंपनीकडून आला असल्यामुळे ती देशातील अशा प्रणालींची सर्वात मोठी निर्यातदार ठरली. कंपनीचा ग्राहक आधार वैविध्यपूर्ण असून त्यामध्ये जागतिक सैन्यदल, कायदा अंमलबजावणी संस्था, होमलँड सिक्युरिटी संघटना आणि जागतिक संरक्षण OEMs यांचा समावेश आहे.
ही कंपनी इंटरनॅशनल ट्रॅफिक इन आर्म्स रेग्युलेशन्स (U.S.) (आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यवहार नियमावली (ITAR)) मुक्त प्रगत सेन्सिंग, प्रोसेसिंग, कम्युनिकेशन आणि मार्गदर्शन प्रणालींचे डिझाइन, विकास आणि उत्पादन करते. त्या देखरेख (सर्व्हेलन्स), टेहळणी (रीकॉनिसन्स), लक्ष्य (टार्गेटिंग) आणि नियंत्रण यासाठी वापरल्या जातात. स्वतंत्र टॅक्टिकल सिस्टीम्सपासून एकत्रित स्वयंचलित प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सकडे कंपनीचा प्रवास सुरू असून रणांगणावरील तैनातीसाठी अनेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपप्रणालींचे एकत्रीकरण केले जाते.
कंपनीचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ प्रामुख्याने टॅक्टिकल सिस्टीम्स आणि प्लॅटफॉर्म सिस्टीम्समध्ये वर्गीकृत असून, दृश्यमान इमेजिंगपासून ते लाँग-वेव्ह इन्फ्रारेड आणि मल्टी-सेन्सर इमेजिंगपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्यापते. यामध्ये थर्मल इमेजिंग कोअर्स, वेपन साइट्स, हातात धरता येणारे थर्मल इमेजिंग बायनॉक्युलर्स, टार्गेटिंग सिस्टीम्स, मिसाइल सीकर्स, फायर कंट्रोल सिस्टीम्स आणि मिसाइल मार्गदर्शन प्रणालींचा समावेश आहे. यामुळे युद्धभूमीवर वर्चस्व राखता येते.
कंपनीचे ऑफरिंग मिनिएचरायझेशन, कमी साइज-वेट-अँड-पॉवर (SWaP) डिझाइन्स, मॉड्युलर पेलोड्स आणि AI-सक्षम इमेज प्रोसेसिंगवर भर देते. याचे उपयोग रिमोट वेपन स्टेशन्स, मिसाइल सीकर्स, ISR प्लॅटफॉर्म्स, आर्मर्ड व्हेईकल्स आणि सैनिकांसाठी परिधान करता येणाऱ्या प्रणालींमध्ये होतात. रणांगणावर सैनिकांना सहाय्य करणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि काही ठिकाणी त्यांची जागा घेणे हे उद्दिष्ट आहे.
30 जून 2025 पर्यंत, कंपनीच्या 24 देशांमध्ये 20,000 पेक्षा अधिक यंत्रणा तैनात आहेत.
ही कंपनी भारतातील मोजक्या संरक्षण कंपन्यांपैकी एक असून तिच्या ऑप्टिक्स, एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांतील बौद्धिक संपदेवर (IP) 100% मालकी आहे आणि कोणत्याही बाह्य तंत्रज्ञान भागीदारावर तिचे अवलंबन नाही. कंपनी अॅसेट-लाईट मॉडेलवर कार्य करते, ज्यामध्ये मुख्य डिझाइन आणि IP मालकी स्वतःकडे ठेवून, उत्पादन प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) भागीदारांकडे आउटसोर्स केले जाते. यामध्ये केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि अॅव्हलॉन टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
यांचा समावेश आहे. मात्र, सर्व प्रोटोटाइप विकास, सिस्टीम इंटिग्रेशन आणि पात्रता चाचण्या कंपनीतच केल्या जातात.
30 सप्टेंबर 2025 रोजी, कंपनीकडे 2,665.70 दशलक्ष रु. चा ऑर्डर बुक होती. जोडीला 1 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कंपनीला एकूण 716.80 दशलक्ष रु. इतक्या किंमतीच्या ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत.
30 जून 2025 रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, कामकाजामधून मिळालेला महसूल 686.77 दशलक्ष रु. इतका होता. यामध्ये भारताकडून 632.86 दशलक्ष रु. योगदान मिळाले. हे एकूण महसुलाच्या 92.15% आहे. उर्वरित जग (मध्य पूर्व/आफ्रिका) कडून 41.70 दशलक्ष रु. (6.07%) योगदान मिळाले, तर युरोप आणि आशियाकडून अनुक्रमे 3.19 दशलक्ष रु. (0.46%) आणि 7.69 दशलक्ष रु. (1.12%) इतका महसूल प्राप्त झाला. या कालावधीत कंपनीचा करपश्चात नफा (PAT) 54.31 दशलक्ष रु. असून PAT मार्जिन 7.68% होते.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये, कामकाजामधील महसूल वाढून 4,690.80 दशलक्ष रु. झाला. यामध्ये युरोप हा सर्वात मोठा योगदानकर्ता ठरला असून 3,065.18 दशलक्ष रु. म्हणजेच एकूण महसुलाच्या 65.34% इतका वाटा होता. त्यापाठोपाठ भारताचा 1,570.44 दशलक्ष रु. (33.48%), आशियाचा 7.69 दशलक्ष रु. (0.16%) आणि अमेरिकेचा 0.51 दशलक्ष रु. (0.01%) इतका वाटा होता. या आर्थिक वर्षात PAT 727.60 दशलक्ष रु. इतका असून PAT मार्जिन 15.34% होते.
परदेशी ग्राहकांकडून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 2025 मध्ये 3,073.38 दशलक्ष रु. इतका झाला, जो कामकाजातून मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या 65.52% आहे. याची तुलना आर्थिक वर्ष 2024 मधील 2,081.46 दशलक्ष रु. (48.61%) आणि आर्थिक वर्ष 2023 मधील 180.64 दशलक्ष रु. (18.66%) यांच्याशी करता येते. 30 जून 2025 रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, भारताबाहेरील ग्राहकांकडून मिळालेला महसूल 44.89 दशलक्ष रु. होता. तो कामकाजातून मिळणाऱ्या महसुलाच्या 6.54% इतका आहे.
कंपनीच्या प्रमुख प्रकल्पांमध्ये भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी उच्च कार्यक्षम EO/IR गिंबलसह एअरबोर्न सिस्टीम्सचा विकास, संरक्षण उत्पादन कंपनीसाठी प्रगत कॉम्प्युटर व्हिजन क्षमतेसह मल्टी-स्पेक्ट्रल इन्फ्रारेड सीकर आणि कमांड लाँचर युनिट, तसेच भारतीय सशस्त्र दलांसाठी आव्हानात्मक वातावरणात विद्यमान FSO तंत्रज्ञानाच्या मर्यादा दूर करणारी, भूस्तरीय व नौदल वापरासाठी उपयुक्त किफायतशीर FSO कम्युनिकेशन सिस्टीम यांचा समावेश आहे.
जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
