Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सर्वांगीण प्रगती, सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी व लोकशाही अबाधित राखण्यासाठी, काँग्रेस आघाडीस विजयी करा …

काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
मुंबई  :  ‘कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी, नगरपालिका व नगर परिषदांचा सर्व समावेश विकास साधण्यासाठी, सर्वांगीण प्रगती, सामाजिक सुरक्षा साधण्यासाठी व लोकशाही अधिकार’ अबाधित राखण्यासाठी “राज्यातील नगर परीषदा, नगराध्यक्ष निवडणुकीत” काँग्रेस प्रणीत मविआ आघाडीस विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी गांधी भवन, मुंबई येथून प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे राज्यातील जनतेस आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, सत्तेवर टिकून राहण्यासाठी भाजप महायुती सरकारने अंधाधुंध पणे सवंग लोकप्रियतेच्या योजना जाहीर केल्याने, राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असुन राज्यावर तिप्पट पेक्षा जास्त कर्जाचा बोजा झाला असल्याने, ‘महायुती सरकार’चा डोळा महापालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या कोट्यवधींच्या ठेवी व पैशांवर आहे त्यामुळेच गेली ३/४ वर्षे प्रशासकीय सत्ता राबवत लोकशाही मार्गाने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जानेवारी २६ च्या आत निवडणुका घेणे महायुती सरकारला भाग पडल्याचे वास्तव आहे.
सत्ताधारी महायुतीतील मंत्री सत्तेचा अंधाधुंध गैरवापर करत आहेत, जमीन व स्टँम्प ड्युटी लुबाडणुक प्रकरणी व नोटांच्या राशी व बंडले सापडून देखील आवश्यक कायदेशीर कारवाई होत नसल्यानेच, न्यायालय वारंवार प्रश्न उपस्थित करत आहे.
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असुन डॅा संपदा मुंडे, सरपंच संतोष देशमुख हत्या, अक्षय शिंदे फेक एन्काउंटर सारखी प्रकरणे महीनोमहीने न्यायापासून वंचित आहेत.
अशा विविध संकटातून, सामाजिक, धार्मिक व जातीय असुरक्षिततेतुन राज्यास बाहेर काढण्यासाठी राज्यातील जनतेने काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांनाच निवडणूक देऊन जनतेच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिका व नगरपरिषदांच्या माध्यमातुन मोठे शक्ती / (शक्ती रुपी कवच) निर्माण करणे ही काळाची गरज आहे हे ध्यानात घेऊन, स्वहक्काचे व लोकशाही’चे पुढील भवितव्य व जबाबदारी ओळखून, मतदान करावे व “काँग्रेस मविआ ला बहुमताने निवडून द्यावे” असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मतदानाच्या पुर्व संध्येस केले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading