Thursday, April 2, 2026
BusinessLatest News

महाराष्ट्रातील गृहनिर्माण विकासाला गती देण्यासाठी पीएनबी हाउसिंग फायनान्सची पीएमएवाय-यू 2.0 आणि आर्थिक समावेशनाला चालना

पुणे : भारतातील अग्रगण्य गृहनिर्माण वित्त कंपन्यांपैकी एक असलेल्या पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने महाराष्ट्रात गृहमालकीला पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतानाच ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) लाभ घेण्यास सक्षम करण्यावर सातत्याने भर दिला आहे. PMAY-U 2.0 अंतर्गत आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून, पीएनबी हाऊसिंग फायनान्स कुटुंबांना – विशेषतः प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना – त्यांची घर खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत करत आहे. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनालाही पाठिंबा देत आहे.

परवडणाऱ्या घरांसाठीची पीएनबी हाउसिंगची योजना, ‘रोशनी होम लोन्स’ ही देशातील निम-शहरी आणि विकसनशील भागांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी आहे. महाराष्ट्र हे एक प्रमुख वाढीचे क्षेत्र असून 25 समर्पित ‘रोशनी’ शाखांसह 47 शाखांचे मजबूत जाळे आहे. परवडणाऱ्या घरांसाठी आणि उदयोन्मुख बाजारपेठांसाठीच्या कर्ज योजनांद्वारे कंपनी आपल्या असंघटित आणि स्वयंरोजगार करणाऱ्या घटकांसाठी अनुरूप उपाययोजना देखील देते. यामुळे पारंपरिक उत्पन्नाच्या कागदपत्रांपलीकडे गृह वित्तपुरवठ्याची व्याप्ती वाढते.

कंपनीच्या वाटचालीबाबत पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे कार्यकारी संचालक जतुल आनंद म्हणाले: “गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवणाऱ्या PMAY-U 2.0 सारख्या सरकारच्या दूरदृष्टीच्या उपक्रमांचे आम्ही मनापासून कौतुक करतो. अशा उपक्रमांनी लोकांना त्यांच्या मालकीच्या घराच्या स्वप्नाच्या जवळ आणले आहे. आमच्या सर्वात आशादायक विकास केंद्रांपैकी एक म्हणून महाराष्ट्र उदयास आले आहे, आणि येथील ग्राहकांसाठी गृहकर्जाची प्रक्रिया सहजसोपी करून देताना आम्हाला अभिमान वाटतो. PMAY-U 2.0 योजनेबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून आणि व्याज अनुदानाचा लाभ मिळवून देऊन आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ज्यामुळे राष्ट्र उभारणी आणि विकसित भारताच्या व्यापक ध्येयामध्ये योगदान दिले जाईल.”

PMAY-U 2.0 बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक जनजागृती मोहीम राबवणार आहे. यामध्ये निम-शहरी जिल्ह्यांमध्ये संवादात्मक सत्रे आणि सूचीबद्ध लाभार्थ्यांसाठी लक्ष्यित कार्यक्रमांचा समावेश असेल. संभाव्य घरमालकांना त्यांची पात्रता, व्याज-अनुदान लाभ आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्ससारख्या विश्वसनीय कर्ज भागीदारांद्वारे PMAY-संबंधित कर्ज मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात कंपनी सातत्याने प्रगती करत आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली तसेच ओमनीचॅनलद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे. अलीकडेच, कंपनीला इंडिया रेटिंग्सकडून ‘IND AA+’ वरून ‘IND AAA’ पर्यंत क्रेडिट रेटिंगमध्ये वाढ मिळाली आहे, जी कंपनीची सातत्यपूर्ण आर्थिक ताकद आणि मालमत्तेच्या गुणवत्तेतील सुधारणा दर्शवते. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या कर्जपुस्तिकेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या आराखड्यासह आणि 500 हून अधिक शाखांच्या अखिल भारतीय नेटवर्कसह, पीएनबी हाउसिंग फायनान्स गृहनिर्माण-आधारित विकासाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading