Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या २५२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

पुणे 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरात आघाडी घेतली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केल्याप्रमाणे गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेला इच्छुक उमेदवारांचा हा कल जनतेच्या मनातील कौल स्पष्ट करणारा आहे अशी भावना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

आ. श्री. बापूसाहेब पठारे, मा.खा. वंदनाताई चव्हाण, मा.आ. श्री. अशोकबापू पवार, मा. आ. श्री. जयदेवराव गायकवाड, श्री. अंकुशअण्णा काकडे, श्री. रवींद्रअण्णा माळवदकर, श्री. भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, श्री. निलेश निकम, श्री. विशाल तांबे, श्री. काकासाहेब चव्हाण, सौ. अश्विनीताई कदम, सौ. स्वातीताई पोकळे, श्री. उदय महाले, श्री. पंडित कांबळे यांच्यासह शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading