Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाला विजेतेपद !!

‌‘इकोल करंडक‌’ १९ वर्षाखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा !!

 

पुणे :  इकोल स्पोर्ट्‌‍स फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‌‘इकोल करंडक‌’ १९ वर्षाखालील महिला एकदिवसीय आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत प्रांजली पिसे हिने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने वॉरीयर्स क्रिकेट ॲकॅडमीचा २ गडी राखून सहज पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

भरे गांव, मावळ येथील एकोल क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात वॉरीयर्स क्रिकेट ॲकॅडमीने पहिल्यांदा खेळताना ३५.३ षटकामध्ये १०४ धावांवर संपुष्टात आला. याग्या राजपूत हिने २३ धावा करून संघाचा डाव सावरला. राधिका थोरवत (१५ धावा) हिनेपण छोटी खेळी केली. सृष्टी भांगे हिने १६ धावांत ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. प्रांजली पिसे आणि अमानी नंदाल या जलदगती गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून वॉरीयर्सचा डाव झटपट गुंडाळला. हे लक्ष्य पीडीसीए संघाने २६.५ षटकामध्ये ८ गडी गमावून पूर्ण केले. श्रेयसी पी. (२५ धावा), प्रांजली पिसे (२१ धावा) आणि अमानी नंदाल (१६ धावा) यांनी धावा जमवून संघाचे विजतेपद निश्चित केले. वॉरीयर्सच्या मधुरा इंगवले हिने अचूक गोलंदाजी करताना २४ धावांत पाच गडी टिपले, पण वॉरीयर्स संघाचे विजेतेपद यावेळी दुर राहीले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स्‌‍ समिती सदस्य नीता कदम, समिती सदस्य कमल सावंत, इकोल स्पोर्ट्‌‍स फाऊंडेशनचे संचालक आणि समिती सदस्य शुभेंद्र भांडारकर, इकोल स्पोर्ट्‌‍स फाऊंडेशनचे संचालक दर्शन जिंदाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इकोल स्पोर्ट्‌‍स फाऊंडेशनचे शशांक जोशी यांनी केले. विजेत्या पीडीसीए आणि उपविजेत्या वॉरीयर्स ॲकॅडमी यांना करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आली.

अंतिम संक्षिप्त निकालः
वॉरीयर्स क्रिकेट ॲकॅडमीः ३५.३ षटकात १० गडी बाद १०४ धावा (याग्या राजपूत २३, राधिका थोरवत १५, सृष्टी भांगे ३-१६, प्रांजली पिसे २-८, अमानी नंदाल २-६) पराभूत वि. पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए)ः २६.५ षटकात ८ गडी बाद १०५ धावा (श्रेयसी पी. २५, प्रांजली पिसे २१, अमानी नंदाल १६, मधुरा इंगवले ५-२४, लावण्या मेमाने ३-१९); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः प्रांजली पिसे;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः प्रांजली पिसे (पीडीसीए, २१४ धावा, ६ विकेट, २ झेल, २ धावबाद);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः आर्या मगर (एसएआरके, २५१ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः मधुरा इंगवले (वॉरीयर्स ॲकॅडमी, १४ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः शिवांशी कपूर (पीडीसीए, ६ झेल, ३ धावबाद);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading