Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘शुभमंगल सावधान’ ची आरोग्य फेस्टिवल साठी निवड

पुणे : डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित ‘शुभमंगल सावधान’ या माहिती पटाची चौदाव्या आरोग्य फेस्टिवल साठी निवड झाली आहे. ‘थॅलेसेमिया’ या आजाराविषयी यात नाट्यपूर्णरित्या माहिती दिली आहे. याचं लेखन कु. सुखदा दामले यांनी केलं केलं आहे. प्रमोद पाठक, वर्षा मिसाळ, नियती मिसाळ अक्षय आठवले, आणि प्रमोद एकबोटे यांनी यात का केलं आहे. तांत्रिक बाजू राजू भोसले यांनी सांभाळली आहे.

दि.१२व १३ डिसेंबर २०२५ रोजी पी.एम.शहा फाऊंडेशन आयोजित हा फेस्टिव्हल नॅशनल फिल्म अर्काइव्ह येथे होणार आहे.डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित वेगवेगळ्या माहितीपटांची सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली आहे.

कृष्णा विश्व विद्यापीठासाठी त्यांनी हे माहितीपट केले.डॉ.दामले हे कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, उप कुलपती डॉ. प्रवीण शिंगारे कुलगुरू डॉ. नीलिमा मिश्रा, कुलसचिव डॉ.मुकुंद घोरपडे आणि सल्लागार डॉ. वेद प्रकाश मिश्रा यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading