Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

येत्या रविवारी  ‘रिफ़्ले’ या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांना घेता येणार काव्यात्मक नृत्याची अनुभूती

पुणे : नृत्यकलेसोबतच लय, कविता आणि एक विलोभनीय आविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना येत्या शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी मिळणार आहे, निमित्त आहे भारतातील फ्रेंच इन्स्टिट्यूट आणि अलायन्स फ्रँसेज नेटवर्कच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिफ़्ले’ या विशेष कार्यक्रमाचे. ६ डिसेंबर रोजी सायं. ७.३० वाजता सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील कलाग्राम येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम पाहण्यास कोणतेही प्रवेशशुल्क नाही. परंतु बुक माय शो व गुगल लिंकच्या माध्यमातून नोंदणी करणे गरजेचे असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. इच्छुकांनी https://in.bookmyshow.com/events/reflet/ET00473668 अथवा https://docs.google.com/forms/d/1dYhDJrBLldTf0eEfrGOaMUqBoiutsAsEVyu39Ktu2dE/edit या लिंक वर नोंदणी करावी.

फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांच्यासोबत शिह-या पेंग हा कार्यक्रम सादर करणार असून समकालीन नृत्य हिप-हॉप, रोलर स्केटिंग आणि दृश्य कला यांचा एक अनोखा व संवेदनशील संवाद उपस्थित रसिकांना अनुभविता येईल. संगीतकार ज्यूल्स एव्ह्रार्डचे यांनी या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रण केले असून याद्वारे रसिक प्रेक्षक एक नवे जग नक्की अनुभवतील असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

या आधी २०२३ मध्ये झुआन ले यांनी भारत दौरा केला होता, यामध्ये ते एक कलाकार-नर्तक म्हणून सहभागी झाले होते. मात्र, आता आपली कंपनी झुआन ले यांच्या सोबत ते करीत असलेला भारत दौरा महत्त्वाचा असेल. रिफ़्ले या कार्यक्रमाद्वारे झुआन ले स्वतःची निर्मिती आणि रसिकांसोबतचा एक विशेष कलात्मक संवाद घेऊन आले असून हा कार्यक्रम त्यांच्या फ्रेंच इन्स्टिट्यूट इन इंडियाज परफॉर्मिंग आर्ट्स टूरचा एक भाग आहे. या टूर अंतर्गत कोची, जयपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि गोवा या भारतातील प्रमुख शहरांत ते सादरीकरण करणार आहेत.

भारतात परत येणे हे माझ्यासाठी खूप खास असून २०२३ मध्ये पिक्सेलसोबतचा माझा अनुभव आणि भारतीय प्रेक्षकांची ऊर्जा तेव्हापासून आजपर्यंत माझ्यासोबत आहे असे असे सांगत झुआन ले म्हणाले, “रिफ्लेचा भारतातील पहिला दौरा हा आमच्यासाठी नवीन प्रेक्षकांसोबत जोडण्याची आणि आमची कलात्मक भाषा त्यांच्या समोर आणण्याची एक उत्तम संधी आहे. मी आणि माझी टीम या कार्यक्रमांसाठी आणि या दरम्यान होणाऱ्या कार्यशाळेसाठी उत्सुक आहोत.”

कंपनी झुआन ले यांविषयी –
फ्रेंच नृत्यदिग्दर्शक आणि फ्रीस्टाइल स्लॅलम चॅम्पियन झुआन ले यांनी २०१६ मध्ये पॅरिसमध्ये कंपनी झुआन ले ची स्थापना केली. यामध्ये नृत्य आणि दृश्य कला यांचे मिश्रण असलेले हायब्रिड सादरीकरण केले जाते. बोकल आणि रेफ्ले सारख्या कामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने ला व्हिलेट आणि सीसीएन डी क्रेटील सारख्या आघाडीच्या फ्रेंच संस्थांद्वारे आपले सादरीकरण केले आहे. कंपनीची प्रत्येक निर्मिती ही आत्मसमर्पण, आणि संतुलनाचा एक अनुभव आहे असे म्हणता येईल.

भारतातील फ्रेंच संस्थेविषयी –
भारतातील फ्रेंच संस्था (इन्स्टिट्यूट फ्रँकाइस एन इंडे) ही भारतातील फ्रान्सच्या दूतावासाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक शाखा असून याद्वारे कला, शैक्षणिक व नवोपक्रम यांमध्ये इंडो-फ्रेंच भागीदारी वाढण्याच्या दृष्टीने काम केले जाते. विद्यार्थ्यांची गतिशीलता, संशोधन सहकार्य, फ्रेंच भाषा आणि संस्कृतीच्या प्रचाराला संस्थेच्या वतीने कायमच समर्थन दिले जाते.

अलायन्स फ्रँसेज नेटवर्क यांविषयी-
अलायन्स फ्रँसेज नेटवर्क भारत आणि फ्रान्समधील सांस्कृतिक संबंध मजबूत करताना फ्रेंच भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देते. दिल्ली ते चेन्नई, मुंबई ते अहमदाबाद पर्यंत देशभरात त्यांची १५ केंद्रे असून, हे केंद्र भारत-फ्रेंच संवाद आणि कलात्मक देवाणघेवाणीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading