उपशास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदानासाठी डॉ संजीव शेंडे यांचा सन्मान
यावेळी आपले विचार व्यक्त करताना पं. अजय पोहनकर यांनी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. घराणं म्हणजे एखाद्या स्टॅम्प सारखं असतं त्यामुळे प्रत्येक कलाकाराने स्वत:ची शैली विकसित करायला हवी, असा सल्लाही पं. पोहनकर यांनी युवा कलाकारांना दिला.
डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांना आदरांजली म्हणून आयोजित करण्यात आलेल्या सूर महती महोत्सवात झालेला सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा असून डॉ. शेंडे यांनीही डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि खांडेकर कुटुंबीय यांप्रती असलेला आदर व्यक्त केला. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडक तालीमीत माझी मुलगी सावनी शेंडे तयार झाली असेही ते यावेळी म्हणाले. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या विश्वविख्यात गायिका होत्या पण त्यांनी कायम मला लहान भावाप्रमाणे वागविले अशी आठवण देखील डॉ. शेंडे यांनी सांगितली. अशोक पारीख यांनी सुरभी सेवा परिवाराच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले.
