येत्या १४ एप्रिलला रंगणार मेलडीयस मंगेशकर्स कार्यक्रम
पुणे : भारतीय संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांवर आधारित मेलडीयस मंगेशकर्स या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पराग माटेगावकर बाबूज लक्ष्मीनारायण चिवडाचे संचालक प्रशांत डाटा यांच्या सहकार्याने करत आहेत. सदर कार्यक्रम सोमवर, दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संपन्न होईल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येईल व काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर व गायक संदीप उबाळे हे कार्यक्रमातील प्रमुख कलाकार असतील. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रीयालीटी शोजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले विविध तालवाद्यांचे वादक निलेश परब यांचा विशेष कार्यक्रम असेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णा माटेगावकर व निलेश परब यांना बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्या येणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
