fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

पुणे : आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे  लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व मोठ्या संख्येने समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी अर्ज भरला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading