Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

PIFF : नवी वाट हळूहळू मोठी व्हायला लागली – दिग्दर्शक सुनील सुखथनकर


पुणे  : सामाजिक प्रश्नांना हाताळणारे, विचार करायला लावणारे मराठी चित्रपट बनवले जावेत, अशी इच्छा होती, त्यानुसार आम्ही सुरुवात केली. आम्ही सुरू केलेली नवी वाट हळूहळू मोठी व्हायला लागली, असे मत दिग्दर्शक सुनील सुखथनकर यांनी व्यक्त केले.
सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘आउट हाऊस’, हिंदी चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) प्रदर्शित करण्यात आला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी चित्रपटातील कलाकार मोहन आगाशे उपस्थित होते.
सुकथनकर म्हणाले, १९९४ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर असे जाणवले, की मराठी सिनेमा हा मुख्यतः बायकांना रडवणारा आणि पुरुषांना हसवणारा होता. हिंदी चित्रपटांची नक्कल त्यात काही अंशी दिसत होती. तो फक्त करमणुकीच्या हेतूने बनवला जात होता. अशावेळी मराठीत काहीतरी वेगळे बनवण्याची माझी इच्छा होती. त्यातून सामाजिक प्रश्नांना हाताळणारे चित्रपट बनवणे सुरू केले. आता आम्ही सुरू केलेली नवी वाट हळूहळू मोठी व्हायला लागली आहे आणि प्रेक्षकवर्ग तयार व्हायला लागला.
चित्रपटाबद्दल बोलताना सुकथनकर म्हणाले, की चित्रपटाची प्रेरणा खरंतर आपल्याला आयुष्यातूनच मिळायला हवी. न उमजलेली प्रेरणा आम्ही चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणण्याचा आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा एक असाच प्रयत्न आहे.
या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर आणि मोहन आगाशे, जीहान यांच्या भूमिका आहेत. ते म्हणाले, “आधी हा चित्रपट दिल्ली येथे शूट करण्याचे ठरले होते. परंतु मुख्य कलाकार नाना (मोहन आगाशे) हे पुण्याशी संबंधित व्यक्तिमत्त्व होते आणि ते पात्र हे रुळेलेले मराठी पात्र होते, त्यामुळे तो चित्रपट पुण्यातच शूट करण्याचे ठरवले. भांडारकर रोड येथील एक बंगला यासाठी निवडण्यात आला.”

मोहन आगाशे म्हणाले, “मराठी चित्रपटांनी केवळ करमणुकीच्या जगातून बाहेर यायला हवे. स्क्रिनिंग संपले की विचार सुरू व्हायला हवा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading