Monday, October 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू

तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक नवा कार्यक्रम,“पारू”
ही गोष्ट आहे, गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या पारूची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडच निरागसपणा घेऊन आलीये, ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आलीये. शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का? हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.
ट्रम्प कार्ड प्रोडक्शन ने ह्या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत राजू सावंत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. तिच्या सोबत असतील प्रमुख भूमिकेत असतील प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकार असणार आहेत,
तर प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज असलेली “पारू” येतेय लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading