Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘भाग्य दिले तू मला’मध्ये विदिशा म्हसकरची एन्ट्री…

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमालाचा नवा प्रवास, नवी सुरुवात पाहायला मिळते आहे. या नव्या प्रवासात एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. एका आश्चर्यकारक आणि नव्या वळणावर अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाणारी विदिशा आता ‘किमया’ हे सकारात्मकतेने भरलेलं पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकतेय. विधिशा साकारत असलेली ‘किमया’ ही एक आत्मविश्वासू, हुशार, समजूतदार, बिनधास्त व सगळ्यांना मदत करणारी असून मालिकेत ती राजची टीम लीडर आहे. ही भूमिका विदिशा नेहमीच्या नकारात्मक पात्रांपासून नक्कीच वेगळी असून तिची ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. किमया म्हणून तिची कामगिरी, अभिनय प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. किमयाच्या येण्याने मालिकेत काय काय घडणार आहे हे पाहण्यासाठी नक्की बघा, ‘भाग्य दिले तू मला’, सोम – शनि, रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading