मंदार वाकणकर, नीरज आनंद, अमित लाटे, नितीन किर्तने, अजय कामत, भूषण अकूट, अजित पेंढारकर, किशोर सबनानी अंतिम फेरीत !!
पुणे : सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या ‘सोलारीस करंडक’ जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेत पुण्याच्या मंदार वाकणकर, नीरज आनंद, अमित लाटे, नितीन किर्तने, अजय कामत यांच्यासह मुंबईच्या भूषण अकूट, अजित पेंढारकर आणि किशोर सबनानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मयुर कॉलनी येथील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये ३५ वर्षावरील गटात पुण्याच्या मंदार वाकणकर याने पुण्याचाच जॉय बॅनर्जी याचा ९-३ असा पराभव केला. पुण्याचा आणि चौथा मानांकित नीरज आनंद याने कर्नाटकच्या आणि अग्रमानांकित जयेश सोळंकी याचा ९-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ४५ वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या अमित लाटे याने शहर-सहकारी सुनिल लुल्ला याचा ९-८ (७-१) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. पुण्याचा आणि राष्ट्रीय खेळाडू नितीन किर्तने याला पुढे चाल मिळाली.
५५ वर्षाखालील गटामध्ये पुण्याच्या आणि अग्रमानांकित अजय कामत याने यवतच्या शिरीष नांदूरडीकर याचा ९-५ असा पराभव केला. मुंबईच्या भूषण अकूट याने पुण्याच्या रणजीत चव्हाण याचा ९-२ असा सहज पराभव केला. ७० वर्षावरील गटामध्ये चौथ्या मानांकित आणि मुंबईच्या अजित पेंढारकर याने पुण्याचा शाम गायकवाड याचा ९-५ असा सहज पराभव केला. मुंबईच्या किशोर सबनानी यांनी पाचव्या मानांकित आणि गुजरातच्या महेंद्र कक्कड यांचा ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः एकेरी गटः
३५ वर्षावरील गटः उपांत्यपुर्व फेरीः
जॉय बॅनर्जी (महा) वि.वि. संतोष दळवी (महा) ८-१;
जयेश सोळंकी (कर्नाटक, १) वि.वि. रविंद्र पांड्ये (महा, ७) ८-६;
नीरज आनंद (महा, ४) वि.वि. शैलादीत्य बॅनर्जी (ओरीसा) ६-१, ७-५;
मंदार वाकणकर (महा) वि.वि. संदीप पवार (महा, २) ८-१;
३५ वर्षावरील गटः उपांत्य फेरीः
मंदार वाकणकर (महा) वि.वि. जॉय बॅनर्जी (पुणे) ९-३;
नीरज आनंद (महा, ४) वि.वि. जयेश सोळंकी (कर्नाटक, १) ९-५;
४५ वर्षावरील गटः उपांत्यपुर्व फेरीः
अमित लाटे (महा) वि.वि. संदीप आगाटे (महा) ८-२;
रवि कोठारी (महा) वि.वि. कृष्णा देवेंद्र (महा, १) ६-७ (५), ७-४;
नितीन किर्तने (महा) वि.वि. धर्मेंद्र शर्मा (गुजरात) ८-२;
सुनिल लुल्ला (महा) वि.वि. प्रशांत जेटली (महा) ८-२;
४५ वर्षावरील गटः उपांत्य फेरीः
अमित लाटे (महा) वि.वि. सुनिल लुल्ला (महा) ९-८ (७-१);
नितीन किर्तने (महा) पुढे चाल वि. रवि कोठारी (महा);
५५ वर्षाखालील गटः उपांत्य फेरीः
अजय कामत (पुणे, १) वि.वि. शिरीष नांदूरडीकर (महा) ९-५;
भूषण अकूट (मुंबई) वि.वि. रणजीत चव्हाण (पुणे) ९-२;
७० वर्षावरील गटः उपांत्यपुर्व फेरीः
अजित पेंढारकर (मुंबई, ४) वि.वि. दिलीप देसाई (गुजरात) ८-२;
किशोर सबनानी (मुंबई) वि.वि. लक्ष्मण अंबूळकर (नाशिक, ९) ८-२;
महेंद्र कक्कड (गुजरात, ५) वि.वि. ए.आर. राव (१, तेलंगणा) ८-४;
शाम गायकवाड (मुंबई) वि.वि. राजेंद्र राठोड (राजस्थान) ७-६ (४);
७० वर्षावरील गटः उपांत्य फेरीः
अजित पेंढारकर (मुंबई, ४) वि.वि. शाम गायकवाड (मुंबई) ९-५;
किशोर सबनानी (मुंबई) वि.वि. महेंद्र कक्कड (गुजरात, ५) ९-४
