सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इलस्ट्रेटर कलाकृतींचे प्रदर्शन
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इलस्ट्रेटर कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनात देशभरातील २२ चित्रकारांची कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग आणि इंडियन इलस्ट्रेटर्स ग्रुप (आयआयजी) यांच्या संयुक्त विद्यामाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या कार्टून म्युझियममध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात प्रवेश मोफत असून सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळात ते सर्वांसाठी खुले राहणार आहे. इंडियन इलस्ट्रेटर्स ग्रुप सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सूरज एस.के श्रीराम यांनी स्थापन केली असून सध्या देशभरातून सुमारे पन्नास सदस्य या ग्रुपचा भाग आहेत. आयआयजी विद्यापीठाच्या म्युझियम ऑफ कार्टून आर्टशी संलग्न आहे.
