IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय चित्रपटांची घोषणा
जगभरामध्ये असलेल्या IMDb च्या कोट्यवधी ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे 2024 मधील सर्वांत प्रतीक्षा असलेला भारतीय चित्रपट म्हणून फायटर घोषित
मुंबई : मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने आज 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय चित्रपटांची घोषणा केली व जगभरामध्ये IMDb वर असलेल्या कोट्यवधी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे निर्धारित झाले.
फायटर (2024 मधील क्र. 1 चा सर्वाधिक प्रतीक्षा असलेला चित्रपट) मध्ये मुख्य भुमिकेमध्ये असलेल्या अभिनेता हृथिक रोशनने म्हंटले, “IMDb नुसार 2024 मधील सर्वांत प्रतीक्षा असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये फायटर क्र. 1 स्थानी आहे, ही अतिशय सकारात्मक आणि विशेष बातमी आहे. फायटरच्या टीजर आणि गाण्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय विलक्षण आहे आणि 25 जानेवारी 2024 रोजी आमच्या प्रेक्षकांना अतिशय वेगळा सिनेमाटीक अनुभव मिळेल, अशी आम्हांला आशा आहे. ह्या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटूया!”
IMDb चे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेले चित्रपट*
- फायटर
- पुष्पा: द रूल – पार्ट 2
- वेलकम टू द जंगल
- सिंघम अगेन
- कलकी 2898 एडी
- बघीरा
- हनू मान
- बडे मियाँ छोटे मियाँ
- कांगुवा
- देवारा पार्ट 1
- छाया
- गुंटूर कारम
- मलाईकोट्टाई वालीबन
- मेरी ख्रिसमस
- कॅप्टन मिलर
- थंगालान
- इंडियन 2
- योद्धा
- मै अटल हूँ
- जिगरा
*2024 मध्ये रिलीज नियोजित असलेल्या सर्व भारतीय चित्रपटांपैकी ही शीर्षके IMDb युजर्समध्ये सर्वांत प्रसिद्ध होती व जगभरातील कोट्यवधी IMDb व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे निर्धारित झाले.
IMDb यादीमधील ह्या 20 शीर्षकांपैकी नऊ हिंदी चित्रपट आहेत, पाच तेलुगू चित्रपट आहेत, चार तमिळ, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपट आहे, हे विशेष आहे. ह्या यादीतील टॉप पाच चित्रपटांमध्ये तीन चित्रपटांमध्ये दीपिका पदुकोन ने काम केले आहे: फायटर (क्र. 1), सिंघम अगेन (क्र. 4), आणि कल्की 2898 एडी (क्र. 5). अलीकडेच घोषित झालेल्या 2023 च्या IMDb सर्वांत प्रसिद्ध भारतीय अभिनेत्यांच्या यादीमध्येही ती तिस-या क्रमांकावर राहिली होती. ह्या यादीमधील चार शीर्षके प्रसिद्ध फ्रँचायजीजचे सीक्वेल्स किंवा पुढचे भाग आहेत: पुष्पा: द रूल – पार्ट 2 (क्र. 2), वेलकम टू द जंगल (क्र. 3), सिंघम अगेन (क्र. 4), आणि इंडियन2 (क्र. 17).
IMDb ग्राहक ही व अन्य शीर्षके त्यांच्या IMDb वॉचलिस्ट मध्ये जोडू शकतात व त्यामुळे त्यांना ती शीर्षके उपलब्ध झाल्यानंतर अलर्टस मिळतील.
