२०२३ मधील भारतातील सर्च क्षेत्राचे बदलते अंतरंग – जस्ट डायलतर्फे सर्वसमावेशक विश्लेषण
जस्टडायल या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मने भारतीयांच्या वेगवेगळ्या सर्चवर आधारित सर्वसमावेशक अहवाल नुकताच प्रकाशित केला. या अहवालात भारतातील लहान आणि मोठ्या शहरांतील आकांक्षा कशाप्रकारे बाजारपेठेला आकार देत आहेत हे मांडण्यात आले आहे.
या सखोल अहवालात ऑनलाइन सर्चेसमधून दिसून येणाऱ्या भारतीय लोकसंख्येच्या वैविध्यपूर्ण गरजा आणि पसंती मांडण्यात आल्या आहेत.
शाळा, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, ब्युटी पार्लर्स आणि पीजी सेवा ही सर्वाधिक सर्च केली जाणारी क्षेत्रे असून त्यावरून देशाचा शिक्षण संस्था, खाद्यपदार्थांची ठिकाणे, आरोग्यसेवा, सौंदर्यसेवा आणि राहाण्याच्या सोयी यांवर असलेला भर दिसून येतो.
डिजिटायझेशनमुळे मोठ्या व छोट्या शहरांतील दरी भरून येत आहे आणि मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील सर्चेसचे प्रमाण दुप्पट आहे. दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा एकूण सर्चेसमधील वाटा ६३ टक्के असून २०२२ च्या तुलनेत लहान शहरांमध्ये सर्चेसचे प्रमाण सातत्यपूर्ण आहे.
शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत हा अहवाल असे सांगतो, की शिक्षण संस्था विशेषतः महाविद्यालयांनी दृश्यमानता आणि संवाद वाढवण्यासाठी महत्त्वाच्या कालावधीनुसार (मे ते ऑगस्ट) धोरण आखणे आवश्यक आहे. शाळा व ग्रंथालयांच्या सर्चेसमध्ये होणारी वाढ त्यांनी प्रवेश प्रक्रिया व परीक्षेच्या हंगामानुसार मार्केटिंगचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सुचवणारी आहे.
प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मागणीत लक्षणीय बदल झाला असून दुसऱ्य व तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा या क्षेत्राविषयी होणाऱ्या सर्चमध्ये ६६ टक्के वाटा आहे. यावरून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पारंपरिक शहरी बाजारपेठेपलीकडे विस्तार करण्यासाठी वाव असल्याचे दिसून येते.
मनोरंजन क्षेत्रात समतोल वितरण दिसून येत असून पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरे छंदवर्गाविषयी माहिती शोधण्यात आघाडीवर आहेत. यावरून सर्वत्र छंदवर्गासाठी लक्षणीय मागणी असल्याचे दिसून येते. पोहणे, नृत्य, शिवणकाम, क्रिकेट प्रशिक्षण, झुंबा, संगीतवर्ग अशा विविध छंदवर्गांत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे.
छंदवर्गाच्या सर्चेसमध्ये मुंबई, दिल्ली आणि चेन्नई ही शहरे आघाडीवर असून अशा शहरी भागात मनोरंजनात्मक उपक्रमांना चांगली मागणी असल्याचे दिसून येते.
आरोग्यसेवा क्षेत्रात हॉस्पिटल्स, त्वचारोगतज्ज्ञ आणि डेंटिस्ट यांच्याविषयी माहिती शोधण्याचे पॅन भारतातील प्रमाण ५ टक्के आहे. सर्चेसमधील हा ट्रेंड आणि मार्च व मे महिन्यात सर्चेसमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन आरोग्यसेवा पुरवठादारांनी हंगामी मागणीचा विचार करायला हवा.
२०२२ च्या तुलनेत स्वास्थ्य आणि सौंदर्य क्षेत्रात १० टक्के वाढ दिसून आली असून त्यावरून भारतात सेल्फ- केयरविषयी जागरूकता वाढत असल्याचे लक्षात येते. वाढती मागणी लक्षात घेऊन व्यवसायांना वेगवेगळ्या प्रदेशांतील विशिष्ट गरजा लक्षात घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या अहवालात व्यवसायांना प्रत्येक श्रेणीतील शहरातील बाजारपेठा, तेथील विकासाच्या संधी, डिजिटल व्याप्ती आणि हंगामी मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या सेवा व उत्पादने तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जस्टडायलतर्फे सद्य स्थिती आणि स्थानिक पसंतीनुसार सेवा- उत्पादने तयार करणे, प्रमोशन करणे, किंमती ठरवणे यांवर जास्त भर देण्याचे सुचवण्यात आले आहे.
हा सर्वसमावेशक अहवाल ट्रेंड्सची माहिती देणारा तसेच प्रत्येक श्रेणीतील शहराची वैशिष्ट्यपूर्ण मागणी मांडणारा आणि या माहितीच्या आधारे व्यवसायांना आपली सेवा- उत्पादने तयार करण्यास मदत करणारा आहे. आपल्या सेवा आणि उत्पादने या ट्रेंडशी सुसंगत राखत व्यवसायांना प्रत्येक श्रेणीच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा पूर्ण करणे, विकास साधणे व ग्राहकांशी संवाद वाढवणे शक्य होणार आहे.
२०२३ वार्षिक सर्च अहवालाविषयी जस्ट डायलचे प्रमुख विकास अधिकारी श्वेतांक दीक्षित म्हणाले, ‘प्रत्येक वर्षी जस्टडायलतर्फे भारतातील सेवा क्षेत्राला आकार देणाऱ्या, सातत्याने बदलत असलेल्या ट्रेंड्सची माहिती देणारा अहवाल तयार केला जातो. नागरिकांना त्यांच्या शिक्षण, घर किंवा वैयक्तिक आवडीशी संबंधित विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ही बांधिलकी भारतात्या वेगाने विकसित होत असलेल्या सर्च क्षेत्राला कार देण्यातील आमची भूमिका अधोरेखित करणारी आहे’
सखोल विश्षेलणासाठी अहवाल पाहा –
*महानगरे: दिल्ली/एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथील सर्च ट्रेंड्स
*लहान शहरे – भारतातील १२०० लहान शहरे व गावांतील सर्च ट्रेंड्स
