Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद स्पर्धा

पुणे : मराठी माध्यमातील विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजी बोलण्याविषयीचा न्यूनगंड कमी व्हावा, यासाठी नातूबाग परिसरातील आदर्श शिक्षण मंडळी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी श्रीकांत भावे स्मृती करंडक ‘इंग्रजी संवाद स्पर्धेचे’ आयोजन केले जाते. स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून मंगळवार, दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हाॅल येथे स्पर्धा होणार आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रशांत मते व डी.पी.जोशी यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे आणि बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. स्पर्धेत यंदा ५० हून अधिक संघ सहभागी झाले असून अपंग विद्यार्थ्यांचे संघ व अंध विद्यार्थ्यांच्या संघाचा विशेष सहभाग असणार आहे.

प्रशांत मते म्हणाले, भविष्यातील इंग्रजीचे महत्व ओळखून कै. श्रीकांत भावे यांनी इंग्रजी भाषेविषयी असलेला विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड घालविण्यासाठी अपार कष्ट घेतले होते. ही स्पर्धा श्रीकांत भावे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केली जाते. यास्पर्धेमुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भिती नाहीशी होत असून आज ते विद्यार्थी सफाईदारपणे इंग्रजी बोलत आहेत. त्याचबरोबर समोर व्यासपीठावर बोलण्याचे धाडस देखील वाढते हे या स्पर्धेचे यश आहे.

छोट्या गटासाठी स्पर्धेचे विषय अ लॉन्ग ट्रेन जर्नी विथ फॅमिली, अ डे इन क्रिकेट स्टेडियम, माय फेवरेट स्वीट डिश, स्कूल ट्रीप, ट्री प्लांटेशन अँड ग्रीन एन्व्हायरमेंट असे आहेत तर मोठ्या गटासाठी चंद्रयान 3 इस्त्रोज बिग कम बॅक, व्हॉट कॅन वुई डू टू प्रीजर्वे छत्रपती शिवाजी महाराज फोर्टस, प्लास्टिक बॅन वर्सेस एन्व्हायरमेंट, रिल लाईफ वर्सेस रियल लाईफ, इलेक्ट्रिक व्हेईकल्स – अ बिगिनिंग ऑफ न्यू एरा असे असणार आहेत.

डी.पी. जोशी म्हणाले, इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी दोन गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन असे देण्यात येणार असून उत्कृष्ट अभिनय, लेखन व दिग्दर्शनासाठी देखील पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख प्रशांत मते ९८५००५४२४५, डी.पी जोशी ९८२२२७०८१६ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading