क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वारसा बसपा थांबू देणार नाही. डॉ हुलगेश चलवादी
पुणे:बहुजन समाज पार्टी पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त फुले वाडा येथील पुतळ्यास डॉ हुलगेश चलवादी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र तील महायुती चे सरकार सरकारी शाळा बंद करीत आहे महात्मा फुले यांनी पाहिलेले स्वप्न धुळीस मिळवू पाहत आहे बसपा हे कदापि होऊ देणार नाही अशा विश्वास डॉ चालवादी यांनी या प्रसंगी व्यक्त केला. यावेळी बसपा सचिव सुदीप जी गायकवाड, बसपा महाराष्ट्र सदस्य अप्पासाहेब लोकरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, पुणे शहर महासचिव सागर खंडे पुणे युवक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शेख ताई, चंद्रकांत सोनावणे,अरविंद लोंढे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
