Monday, August 31, 2026

Day: November 28, 2023

BusinessLatest News

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन

पुणे :  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म, मेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहे. मेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहे. या फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतील. एबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेल. मेडीबडी खूपच कमी किमतीत, फक्त २९९ रुपयांमध्ये, आरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये ओपीडी, लॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभ, हेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहे. मेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेत. मेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईल. या भागीदारीच्या अटी व शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सह-संस्थापक व सीईओ  सतीश कन्नन यांनी सांगितले, “आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो, त्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितो. ही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, आघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहे. आम्हाला खात्री आहे की, ही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल.” भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Read More
BusinessLatest News

महिंद्राने ऍग्रोव्हिजन नागपूर येथे CNG ट्रॅक्टरचे अनावरण केले

नागपूर : भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने त्याच्या लोकप्रिय युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर, नागपूर येथील ऍग्रोव्हिजन येथे आपल्या पहिल्या CNG मोनो इंधन ट्रॅक्टरचे अनावरण केले.

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा भाग आहे!’ : आयुष्मान खुराना

बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याचे क्रिकेटवरील ज्ञान आणि गहन निरीक्षण या विश्वचषकात दिसून आले आहे! त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांशी संपर्क

Read More
ENGLISH

Seerat Kapoor on her role in Bhamakapalam 2: ‘My character is a complete departure from who I am’…

In a thrilling revelation for fans, the poster of the highly-anticipated film Bhamakalapam 2 has been unleashed upon the world,

Read More
ENGLISH

Dish TV Elevates User Experience with Pioneering Voice Search Feature on the ‘My Dish TV App’

Pune : In a striking initiative to enhance user interaction and redefine the interface & entertainment experience, Dish TV, India’s leading DTH company,

Read More
ENGLISH

Future Food Foundation and Country Delight organize the #8510 Health Campaign to promote Children’s Health

Hyderabad : With an objective of improving the health of school-going children, a health rule (or ‘health tenet’ or ‘health mantra’

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘जाऊ बाई गावातच’ गावरान वेलकम गाणं !

आता वाजणार तेव्हा कळणार ! झी मराठीच्या ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण

Read More
Latest NewsPUNE

26/11 हल्ल्यातील शहिदांना छावा मराठा संघटनेच्या वतीने मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली

पिंपरी : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सायंकाळी खडकी रेंजहिल्स अँम्युनेशन फॅक्टरी वसाहत येथे छावा

Read More
ENTERTAINMENTLatest News

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची

Read More