Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

26/11 हल्ल्यातील शहिदांना छावा मराठा संघटनेच्या वतीने मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली

पिंपरी : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सायंकाळी खडकी रेंजहिल्स अँम्युनेशन फॅक्टरी वसाहत येथे छावा मराठा संघटनेच्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
        खडकी येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चिमुकलेही सहभागी झाले होते. मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, माजी नगरसेवक सुनिल जाधव, ऑगस्तीन मोजेस, भास्कर वाकडे, तुषार गरुड, गणेश कांबळे, अनिल जाधव, सुभाष धर्मलिगम, अंश गरुड, शहाजान अली, सलीम शेख, सचिन पवार, दीपक रेड्डी, जोसेफ पिल्ले, राजु पेरुमल, पपु शिंदे, शशिकांत सूर्यवंशी, आनंद पाटील, शरद कुपटे, प्रभाकर पोतकुले, पंकज गायकवाड, बाळू कांबळे, साईनाथ बर्गे, श्रेयस पंडित, सुरेश दाभाडे, दिनेश स्वामी आदींनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
           यावेळी रामभाऊ जाधव म्हणाले, की मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व नागरिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांचा त्याग व बलिदानाची जाणिव ठेवूयात. हा देश भयमुक्त करण्यासाठी काम करुया.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading