पी एन गाडगीळ एक्स्क्लुझिव्ह आपल्या विस्तारासाठी सज्ज
पुणे : पुण्यातील नळस्टॉप येथील दालनाला ग्राहकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता सुप्रसिद्ध पी. एन. गाडगीळ एक्सक्लुझिव्ह हे बाणेर भागाबरोबरच गोव्यात देखील आपली सुसज्ज अशी नवी दालने सुरु करीत विस्तारासाठी सज्ज झाले आहेत. याच विस्ताराचा एक भाग म्हणून प्रयोगशाळेत विकसित (लॅब ग्रोन) हिऱ्यांचे आघाडीचे उत्पादक आणि वितरक असलेल्या पुण्यातील सॉलिटेरिओ या संस्थेशी देखील सहकार्य करार करण्यात आला असून आज झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील औपचारिक घोषणा करण्यात आली.
पी. एन. गाडगीळ एक्सक्लुझिव्हचे संस्थापक अभय गाडगीळ, भागीदार दीपा गाडगीळ, सॉलिटेरिओचे सह-संस्थापक रिकी वसंदानी व सतीश दर्यानानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देताना अभय गाडगीळ म्हणाले, “पी एन गाडगीळ एक्स्क्लुझिव्हच्या पुण्यातील नळस्टॉप येथील दालनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता बाणेर भागाबरोबरच गोव्यात देखील आम्ही आमच्या व्यवसायाचा विस्तार करीत असून यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना सोने, हिरे, चांदी यांचे गुणवत्तापूर्ण कलात्मक दागिने उपलब्ध करून देण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.”
सॉलिटेरिओ ही संस्था आमच्या सारखीच व्यवसायातील गुणवत्ता आणि नैतीकता जपणारी संस्था असल्याने त्यांसोबत सहकार्य करार करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे पी एन गाडगीळ यांचा समृद्ध वारसा आणि सॉलिटेरिओ यांची नाविन्यता अशी सांगड घालत नैसर्गिक व प्रयोगशाळेत विकसित केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांसोबतच सोने- चांदीचे दागिने यांचा अनोखा संग्रह ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहीतीही गाडगीळ यांनी यावेळी दिली.
खाणीतील नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणेच असलेला टिकाऊपणा आणि प्रमाणपत्रांसह येणाऱ्या अस्सल लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीच्या मागणीत मागील काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या ट्रेंडला सामोरे जाण्यासाठी सॉलिटेरिओच्या रूपाने एक सशक्त भागीदार मिळाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे दीपा गाडगीळ म्हणाल्या.
पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्हसोबत काम करताना आम्ही देखील उत्साही आहोत, असे सांगत सॉलिटेरिओचे सह-संस्थापक सतीश दर्यानानी म्हणाले, “सॉलिटेरिओमध्ये आम्ही गुणवत्तेसोबतच पर्यावरणाविषयी जागरूकता यांवर दृढ विश्वास ठेवत ‘लक्झरी’ची नव्याने व्याख्या करण्यावर कायमच भर देत आलो आहोत. या सहकार्य करारामुळे नैतिक आणि शाश्वत लक्झरीचा विचार आणि दृष्टीकोन आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवू इच्छितो.”
“प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले हे हिरे दृश्य, रासायनिक आणि भौतिकदृष्ट्या खाणीतून काढलेल्या हिऱ्यांसारखेच असतात. प्रयोगशाळेत लहान हिऱ्यापासून सुरुवात करून, नैसर्गिक हिरे निर्मिती होताना होणाऱ्या भूवैज्ञानिक परिस्थिती प्रमाणेच याही हिऱ्यांची निर्मिती केली जाते. परंतु, पारंपारिक हिऱ्यांच्या खाणीचे नकारात्मक पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम यामुळे टाळता येणे शक्य असते. शिवाय खाणीत काढलेल्या हिऱ्यांप्रमाणेच सॉलिटेरिओ हिरे आयजीआय आणि जीआयए सारख्या विश्वासार्ह प्राधिकरणांद्वारे प्रमाणित देखील असतात, अशी माहिती रिकी वसंदानी यांनी दिली.
पुढे बोलताना अभय गाडगीळ म्हणाले की, दागिनेनिर्मिती उद्योग हा सध्या एका मोठ्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर आहे. येथे पारंपारिक सोने, चांदी आणि नैसर्गिक हिरे हे प्रयोगशाळेत विकसित होणारे हिरे अशा नव्या श्रेणीत अलगत मिसळत आहेत. अलीकडच्या काही वर्षांत हिऱ्यांच्या खाणींबद्दल बरीच जागरूकता निर्माण झाली असून ग्राहक सध्या नैतिक आणि शाश्वत पर्यायाच्या शोधात आहेत. हा बदल स्पष्टपणे जागतिक पातळीवर देखील दिसत असून नजीकच्या भविष्यातील दागिने उद्योगाच्या बाजारपेठेवर देखील याचा परिणाम दिसून येईल.
या सहकार्य कराराच्या माध्यमातून पुणे, मुंबई, गोवा, हैदराबाद, लुधियाना, लखनऊ, कोची, बेंगळुरू आणि चंदीगड या ठिकाणी खास प्रयोगशाळेत विकसित केलेल्या हिऱ्यांपासून बनविलेले दागिने यांबरोबरच पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्हचे नैसर्गिक हिऱ्यांचे, सोन्या- चांदीचे दागिने ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती रिकी वसंदानी यांनी दिली. याबरोबरच नेक्सस व फिनिक्स मॉल्समध्येही हे दागिने उपलब्ध असतील. परदेशात हे दागिने दुबई, बहामस आणि स्पेनमध्ये उपलब्ध असणार आहेत.
