Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ‘लोकसेवा’तर्फे पुस्तकांचा मोफत संच वाटप

 

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या सदाशिव पेठ येथील जंगमवाडी मठातील विद्यार्थ्यांना लोकसेवा पब्लिकेशनच्यावतीने अभ्यासासाठी पुस्तकांचा मोफत संच देण्यात आला.

सदाशिव पेठ येथील जंगमवाडी मठ येथे राज्यभरातील गरजू आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यानासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकीच शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत १ नोव्हेंबर रोजी मठातील युपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लोकसेवा पब्लिकेशनतर्फे पुस्तकांचा मोफत संच वाटप करण्यात आले.

यावेळी लोकसेवा अकॅडमीचे संपादक संतोष हातनुरे, साईनाथ डहाळे, लेखक विनायक नरवाडे, एमपीएससी वास्तव कट्ट्याचे संपादक किरण निंभोरे, सकाळचे संपादक उमेश घोंगडे, व्यवस्थापक भरत उंबरकर व सुधाकर हलगणे, उद्योजक सचिन चिरमे, छायाचित्रण अनिश कुंभार, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पाटील, संतोष स्वामी व आभार प्रदर्शन नीलकंठ कुरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading