Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

मराठा आरक्षणाला मातंग एकता आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे : मराठा समाजाला आरक्षण बाबत मातंग समाज जाहीर पाठिंबा देत असल्याचे मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज जाहीर केले .आज झालेल्ल्या मातंग एकता आंदोलन संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला .मराठा समाजाला जाहीर पाठिंबा. सदर मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना देण्यात आले .

मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने सविनय निवेदन देण्यात येते की, आज दि. 31/10/23 रोजी सकाळी 11. वा. संघटनेच्या मुख्य कार्यालयातील लव्हुजी सभागृहामध्ये मराठा आरक्षणास जाहिर पांठिबा देणेबाबत अत्यंत तातडीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. गृहराज्य रमेशदादा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्याबाबत ठराव मांडण्यात आला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गेली अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महामोर्चा, आंदोलने, उपोषणे असे विविध प्रकारचे उग्र आंदोलने झाली असून तरी सुद्धा केंद्र व राज्य सरकारचे बघून आंधळे व ऐकून बहिरे हे धोरण चालूच आहे. हे मराठा बांधवांची दिशाभूल करणारे आहे.

तरी राज्य सरकारने त्वरित मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी आम्ही संघटनेच्या वतीने मागणी या बैठकीमध्ये करीत आहोत. इतर समाजाचे आरक्षण आबाधीत ठेवून आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देऊन सध्या सुरू असलेले आंदोलन त्वरित थांबवण्यात यावे. मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीचे जनक मा. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला समाजाच्या आरक्षण संघर्षाला मातंग एकता आंदोलन या राजव्यापी संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने वेगववेगळ्या जिल्हा व तालुक्यामध्ये सहभागी होऊन पाठींबा देतील याची आपण नोंद घ्यावी व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही विनंती. या महत्वपूर्ण बैठकीसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष, नगरसेवक मा. अविनाश बागवे, मुख्य समन्वयक विठ्ठलराव थोरात, महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा खंडाळे, शहर अध्यक्षा राजश्री अडसूळ, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, व इतर शाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading