Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

“मन बहरलं शब्द सुरांनी” मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त “मन बहरलं शब्द सुरांनी” ही मैफिल पुणे लोकमान्यनगर येथे पार पडली.  दोन पिढ्यांना समृध्द करणारा दूरच्या रानात ते रौंदळ पर्यंतचा मंत्रमुग्ध करणारा मेलडीचा प्रवास व आदर्श संगीतकाराची लोकप्रिय गीते या मैफिलीत प्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायन हर्षित अभिराज व त्यांचे सहकारी यांनी सादर केली. या प्रसंगी दुग्धपानाचा आस्वाद घेत सुमधुर संगीत आणि श्रवणीय गीतांनी पुणेकर मंत्रमुग्ध झाले.

बाप्पा मोरया, नीले नीले अंबर पर, दूरच्या रानात, चाँद मेरा दिल, एक लाजरा ने साजरा, रात्रीस खेळ चाले अशी एकापेक्षा एक सदाबहार गीते प्रसिद्ध गायक व संगीतकार हर्षित अभिराज, अवंतिका, उदय गाडगीळ, धनंजय इंगळे, शैलेश भावसार, वर्षा जोभेकर, जया पवार यांनी  सादर केली. या मैफिलीला उद्योजक सौरभ गाडगीळ, आमदार रविंद्र धंगेकर यांनी आर्वजून उपस्थिती लावली होती.

या गीतांच्या मैफलीचे सूत्रसंचालन अभय गोखले यांनी केले. तर मैफिलीचे आयोजन पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक – अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते व डॉ. नरेश मित्तल यांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading